Home स्टोरी यशस्विनी प्रतिष्ठानचामुणगेत रंगला खेळ पैठणीचा!सौ.कोमल सारंग,सौ. सुजाता परब पैठणीच्या मानकरी

यशस्विनी प्रतिष्ठानचामुणगेत रंगला खेळ पैठणीचा!सौ.कोमल सारंग,सौ. सुजाता परब पैठणीच्या मानकरी

90

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलानि एकत्र येऊन त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढवा. एकोप्याची भावना जागृत व्हावी या दृष्टिकोनातून मुणगे येथे महिला मेळावा तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आडबंदरचे सुपुत्र आणि यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आनंद मालाडकर आणि प्रभाग क्रमांक एक सदस्या सौ.रवीना मालाडकर,सौ.अंजली सावंत, ग्रा सदस्य तथा माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ.सायली बागवे यांचा अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी आयोजित स्पर्धांचे परीक्षण सौ.कामिनी ढेकणे आणि सौ.विद्या ढेकणे यांनी केले. आडबंदर वाडी पैठणीचा मानकरी सौ.कोमल सारंग, सोन्याची नथ मानकरी श्रीमती.सुलोचनाआडकर,उत्तेजनार्थ मानकरीसौ. दिशा तळवडकर,सौ. मनस्वी जोशी, सौ.लीना आडकर यांना गौरवण्यात आले. खेळ पैठणीचा कार्यक्रम श्रीमती रूपा मालाडकर यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता.आपई वाडीतील पैठणीचा मानकरी सौ. सुजाता परब आणि सोन्याची नथ श्रीमती.सत्यवती परब, उत्तेजनार्थ मानकरी सौ.अंजली सावंत,सौ.वैभवी .परब,सौ.सविता महाजन याना गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या स्थानिक ग्रा सदस्या, माजी उपसरपंच, माजी सरपंच,परीक्षक,सर्व विजेत्या महिला स्पर्धक, खेळात सहभागी झालेल्या सर्व महिला वर्गाचे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मिञ मंडळाचा वत्तीने श्री.आनंद मालाडकर यांनी मनापासून आभार मानत सर्वाचे अभिनंदन केले.