Home स्टोरी अंबरनाथ येथे अशोक दाभोलकर मेस्त्री व बाळकृष्ण पांचाळ यांचा सन्मान!

अंबरनाथ येथे अशोक दाभोलकर मेस्त्री व बाळकृष्ण पांचाळ यांचा सन्मान!

74

मसुरे प्रतिनिधी:  प्रभू विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या श्री कोकण विश्वकर्मा म़डळ मय पांचाळ समाज अंबरनाथ तर्फे क्रीडा क्षेत्रात उतुंग कामगिरी करुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही यथाशक्ती मदत करीत खेळ प्रचारासाठी ग्रामीण क्षेत्रातील शाळांमधून खेळसंस्कृती प्रचाराचे उद्दीष्ट समोर ठेऊन आजही कार्यरत असलेले अशोक दाभोलकर मेस्त्री (दाभोली, वेंगुर्ला) व शिवप्रतिष्ठान या स्थापन केलेल्या संस्थेमार्फत नाट्यक्षेत्रात कलाकार, स़गीतकार, दिग्दर्शक, निर्माता म्हणून राष्ट्रीयस्तरावर कार्य करताना अनेक प्रतिभावान कलाकार घडविणार्‍या श्री. बाळकृष्ण पांचाळ (नापणे, वैभववाडी) ह्याना शाल श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

आम्ही आमचा रौप्यमहोत्सव साजरा करीत असताना आपल्या विश्वकर्मिय समाजाचे नाव राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावर नेणार्‍या तळकोकणातील दोन कतृत्ववान समाजबांधवांच्या शोधात होतो व आज अशा ह्या दोन व्यक्तींचा सत्कार करताना त्यांच्या बाजूला बसण्याचे भाग्य मला लाभत आहे अशा शब्दात समाजमंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद मेस्त्री ( सेवानिवृत्त डेप्युटी सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्कारमूर्ती अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यानी कै गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली तर्फे मंडळाच्या २५ व्या वर्षाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री. अशोक मारुती पाचाडकर, श्री. पद्माकर दत्तात्रय मेस्त्री, श्री. गजानन कृष्णा पांचाळ, श्री. एकनाथ दगडू सुतार ह्याना शालश्रीफळ, मानपत्र व आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार श्री. अरुण दाभोलकर यांच्या चित्रशाळेत तयार झालेली चित्रफ्रेम देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. आमदार श्री. बालाजी किणीकर,  श्री. मनेष गुंजाळ, श्री. रवी करंजुले,  श्री. संग्राम देसाई, श्री. अशोक पाचाडकर, श्री. पद्माकर गुळवणकर,श्री. गजानन पांचाळ,श्री. एकनाथ मेस्त्री, श्री. दिलीप पांचाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन – श्री. बाळकृष्ण पाचाडकर‌ आभार सचिव श्री. प्रसाद नरळकर यांनी मानले.