Home स्टोरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सावंतवाडी अखिल भारतीय मराठा समाज तर्फे श्रद्धांजली अर्पण..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सावंतवाडी अखिल भारतीय मराठा समाज तर्फे श्रद्धांजली अर्पण..

242

सावंतवाडी प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बहुजन समाजाचे नेते होते. त्यांनी कधी जात पात बघितला नाही. त्यांच्या जाण्याने बहुजन समाज पोरखा झाला आहे. मराठा समाजाचे ते नेते होते. त्यांनी मराठा समाजासाठी मोठे योगदान दिले. शासनाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना शिक्षण उद्योग व्यवसायाला कशी गती देता येईल? या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला.त्यांचे कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्यासारखा आपला हक्काचा माणूस नेता हरपला अशा शब्दात सावंतवाडी अखिल भारतीय मराठा समाज तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात उपमुख्यमंत्री व मराठा समाजाचे नेते अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनाबद्दल अखिल भारतीय मराठा समाज सावंतवाडी शाखेतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी दोन मिनिटे स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी सतीश बागवे, ॲड संतोष सावंत, श्री पुंडलिक दळवी, विनायक गायकवाड यांनी अजित दादा यांच्या आठवणी जागृत केकरत ल्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना आदरांजली वाहिली.

यावेळी सतीश बागवे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा स्पष्ट वक्ता अन्य नाही. त्यांचे काम करण्याची धडाडी वाखांडा जोगी होती. त्यांच्यासारखा नेता आता होणे नाही. जिल्हा ग्रंथालय संघाचे. संचालक. ॲड संतोष सावंत. म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण बहुजन समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी कधी जात पात धर्म पाहिला नाही फक्त समाज सेवा करणे आणि लोकांसाठी झटत राहणे काम करणे हा त्यांचा स्थाही भाव, पष्टवक्ते विनोदी स्वभाव आणि काम करण्याची धमक, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटत राहणे ही त्यांची पद्धत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाचा जो नारा दिला होता तोच वसा त्यांनी पुढे चालवण्याच्या दृष्टीने आपले पाऊल टाकले होते आणि त्या दृष्टीने ते काम करत होते. विशेषता कोकणावर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचे प्रेम होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकरी पशुसंवर्धन आणि सर्वसामान्य जनतेबद्दल ते नेहमीच आवर्जून विचारत कोकणच्या विकासासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम करताना भरीव असा निधी उपलब्ध करून देऊन कोकणला नेहमीच झुकते माप दिले आहे. बहुजन समाजाच्या तरुणांसाठी ते नेहमीच झटत असत तरुणांनी उद्योग व्यवसाय नोकरी धंदा करावा आणि काम करत रहावे. हे ते नेहमीच सांगत असे एक धडाडीचे बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या स्मृती जागृत ठेवायच्या असतील तर अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे दरवर्षी उपक्रम ठेवण्यात यावेत जेणेकरून तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले.

यावेळी विनय गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व्यक्तिमत्व महान होते. त्यांच्या आठवणी व त्यांचे किस्से विशद केले मराठा समाजा च्या तरुणांसाठी काहीतरी करायला हवे अशी धारणा त्यांच्यामध्ये होती आणि त्यानुसार ते आपल्या मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी अनेकांना उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करत त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. यावेळी पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आणि माझे अत्यंत निकटचे संबंध होते. सहा वर्ष मी त्यांच्यासोबत काम केले आहे जेव्हा मी मंत्रालयात जात होतो. तेव्हा कोकणातून आलात का? म्हणून आम्हाला ते पहिले स्थान द्यायचे. आम्ही जेव्हा सावंतवाडीतील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चा प्रश्न घेऊन मंत्रात गेलो तेव्हा त्यांनी हा प्रश्न निश्चितपणे सुटेल. असे अभिवचन दिले आणि त्या दृष्टीने त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचनाही केल्या. त्यांची कामाची पद्धत वाखाणण्याजोगी होती. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेल्यानंतर कोणी मध्यस्थ लागत नव्हता. कोकणाबद्दल आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्हा बद्दल एक वेगळीच ओढ त्यांना होती. त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाची आस्था असणारा नेता गेला त्याचे दुःख होत आहे. अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाधक्ष अभिषेक सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी निश्चितपणे उपक्रम राबवले जातील. असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक देवेंद्र टेमकर व मायकल डिसोजा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम करण्याची हातोटी वेगळीच होती. ते गोरगरीब सर्वसामान्यांचे काम सहजपणे करायचे त्यांच्या जाण्याने सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस गमावला. अशा शब्दात शोक व्यक्त केला . यावेळी अखिल भारतीय मराठा समाज तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, विशाल सावंत, अभिजित सावंत, मनोज घाटकर, पुंडलिक दळवी, श्री सतीश बागवे, दिगंबर नाईक, धोंडी दळवी, ॲड संतोष सावंत,  पुंडलिक दळवी,विनय गायकवाड, बापू राउळ, आनंद नाईक, शांताराम पारधी, मायकल डिसोजा, नगरसेवक देवेंद्र टेमकर, मनीष गावडे, आधी उपस्थित होते..