Home स्टोरी जनसेवा प्रतीष्ठान तर्फे वेर्ले येथे सधवा असलेल्या व नसलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू..!

जनसेवा प्रतीष्ठान तर्फे वेर्ले येथे सधवा असलेल्या व नसलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू..!

216

सावंतवाडी (वेर्ले): विधवा महिला म्हटलं की आजही अनेक ठिकाणी त्यांना शुभकार्यांपासून दूर ठेवले जाते. या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी जनसेवा प्रतीष्ठान तर्फे सधवा महिलां सोबत दरवर्षी विधवा महिलांचे हळदी-कुंकू आयोजित करण्यास सुरुवात केली. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी काैटुंबिक जबाबदारी येत असते. विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांचा जनसेवा प्रतीष्ठानतर्फे हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आल्या. स्वतःच्या विधवा सासुला हळदी कुंकू व वाण देण्याचा विद्रोह डॉ . सई लिंगवत यांनी केला. या घटनेनंतर इतर महिलांसाठी देखील काम करावे. असे त्यांना वाटू लागले. यातूनच विधवा नव्हे स्त्री मी या उपक्रमाची सुरवात झाली. याबाबत त्या सांगतात पती नसलेल्या स्त्रिया मुलांना सांभाळतात. घरकाम करतात उत्कृष्ट शेती करतात त्यांची जबाबदारी असलेले सर्व काम त्या व्यवस्थितपणे पार पाडतात. पण जेंव्हा समाजात सन्मानाची वेळ येते. तेंव्हा त्यांचे हक्क हिरावून घेतले जातात. त्यांना मान सन्मान दिला जात नाही. यासाठी विधवा स्त्रियांची ओठी भरणे, हळदी कुंकू लावणे. हा उपक्रम मी सुरू केला सुरवातीला विरोध झाला. पण आता अनेक विधवा महिला आनंदाने हळदी कुंकू व वाण स्विकारताना आनंदाश्रू ढाळतात. जनसेवा प्रतीष्ठानच्या माध्यमातून सधवा व विधवा महिलांना हळदी कुंकू गेले दहा ते पंधरा वर्षे चालू असुन नवरा वारल्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढणे, त्यांच्या बांगड्या तोडून मृत नवरा यांच्या पायावर टाकणे, मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसले या बाबतीत आपणं जनजागृती करत असुन संबंधित ठिकाणी जाऊन वेळोवेळी समुपदेशनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतो असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी सांगितले.