Home स्टोरी मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे हरिनाम सप्ताह प्रारंभ.

मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे हरिनाम सप्ताह प्रारंभ.

97

मसुरे प्रतिनिधी:  मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदिर येथे २५ जानेवारी पासून हरिनाम साप्ताहास प्रारंभ झाला आहे. उत्सवाची सांगता १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात व दत्त गुरूंची आरती झाली. २६ जानेवारी ते शनिवार ३१ जानेवारी २०२६ अखेरपर्यंत दुपारी १२.०० वा. दत्त गुरुंची आरती रात्रौ ८.०० वा.पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य, रात्रौ १२.०० वा. महाआरती, गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ विशेष कार्यक्रम, दुपारी १२.०० वा.दत्त गुरुंची आरती, रात्रौ ८.०० वा. पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य,रात्रौ १२.०० वा. महाआरती व पालखी प्रदक्षिणा, ३१ जानेवारी २०२६ सायं. ४.०० वा. महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ.१ फेब्रुवारी २०२६ सकाळी १०.०० वा.अखंड हरिनाम सप्ताह सांगता व महाआरती, दुपारी २.०० ते ४.०० वा. महाप्रसाद. सर्व व्यवस्थापन देऊळवाडा, मठवाडी, वेताळटेंबवाडी, पन्हळकर टेंबवाडी, परब वायंगणी, गावठणवाडी, विकासवाडी, दत्तवाडी ग्रामस्थ यंचे आहे. उपस्थितीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुंबई कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.