Home स्टोरी उपरालकर देवस्थानच्या वळणावर अपघात..! सुदैवाने मोटर चालक बचावला.

उपरालकर देवस्थानच्या वळणावर अपघात..! सुदैवाने मोटर चालक बचावला.

218

सावंतवाडी प्रतिनिधी: दारूच्या नशेमध्ये सुनील सलामवाडकर ४३ चंदगड या मोटरसायकल चालकाने रॉंग साईडने येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला परंतु कारचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलून घेतले. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श्री महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले. त्यानंतर सदर अपघात ग्रस्त व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.