Home सनातन स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन.

स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन.

73

सिंधुदुर्ग:- स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय अस्मितेचे विस्मरण सामाज्याकडून होत असल्यामुळे प्रजासत्ताकदिनी आणि स्वातंत्रदिनी मोट्ठ्या अभिमानाने मिरवले जाणारे ‘प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर गटारात पढलेले आढळतात प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस या राष्टध्वजांची विटंबना पाहावी लागते .

 

निवेदनात म्हटले आहे कि , राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता। २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत केंद्र शासनानेही ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे.

 

काही दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील टी-शर्ट आणि अन्य उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याची उत्पादने वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा उत्पादने’, टी-शर्ट हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याची उत्पादने बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.

 

राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली २३ वर्षे राबवते. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्तकदिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, तसेच ते पायदळी तुडवले जातात. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे चेहरा रंगवतात. यामुळे स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे, याची जाणीवही आपल्याला होत नाही. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

 

तरी शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, टी-शर्ट व अन्य उत्पादने आदी विक्री करतात, ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,

 

 

बांदा – येथील पोलीस निरिक्षक श्री गजेंद्र पालवे यांना निवेदन देण्यात आले, तसेच येथील खेमराज मेमोरियल इग्लिश स्कूल बांदा मुख्याधापक श्री प्रदीप देसाई याना निवेदन देण्यात आले

यावेळी सर्वश्री शिवराम देसाई . गुरूप्रसाद मळेवाडकर, प्रदिप देसाई हेमंत दाभोलकर , राजेंद्र परब , सौ.नयन देसाई, सौ.शितल देसाई, आदी उपस्थित होते.

 

कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र नानचे याना निवेदन देण्यात आले यावेळी सर्वश्री रमेश सावंत, सूर्यकांत मालवणकर सुहास बागवे जयवंत सामंत, महादेव गावडे, श्रीधर मुसळे आदी होते.

ओरोस (जिल्हा मुख्यालय) पोलीस ठाणे अमलदार श्रीमती नागरगोजे. याना निवेदन देण्यात आले , सर्वश्री. परेश साटम,विलास मसुरकर, जयदीप सावंत, सुरेश दाभोळकर,रवींद्र परब सुभाष चव्हाण.