अक्कलकोट: नवीन वर्षात कॅलेंडर रूपात स्वामींचा फोटो घरोघरी लागावा हा ट्रस्टचा संकल्प होता. त्यामुळे अक्कलकोट नगरीमध्ये सर्व भक्तांच्या उपस्थितीत स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्या शुभहस्ते नवीन वर्षाचे कॅलेंडर व डायरीचे अनावरण करण्यात आल्याचे प्रतिपादन कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन लोके यांनी येथे केले. श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदेच्या वतीने नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण अक्कलकोट येथे करण्यात आले. अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी मठ येथे चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्र निपुण श्री अन्नू महाराज, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अक्कलकोट अन्नक्षेत्र ट्रस्टचे कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले आणि सर्व भक्तांना स्वामींचे कॅलेंडर आणि डायरी भेट देण्यात आली. यावेळी कोकण कट्टाचे अजितकुमार पितळे, छोटा काश्मीर आरे कॉलनी मठाचे अशोक गुराम, असलदे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सचिन लोके, सचिव प्रशांत साटम, खजिनदार सौ. ज्योती जाधव, विश्वस्त प्रकाश जोईल, मधुसुधन भडसाळे, प्रकाश पावसकर, तात्या निकम आदीसह स्वामी भक्त उपस्थित होते.


भविष्यात स्वामी सेवेत ही ट्रस्ट काम करणार आहे. अनाथांची सेवा आणि दीनदुबळ्यांनां मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असेही यावेळी अध्यक्ष सचिन लोके म्हणाले.ट्रस्टच्या पुढील कार्यासाठी अण्णू महाराज, प्रथमेश इंगळे, अमोलराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.







