Home शिक्षण बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य व गुणगौरव कार्यक्रमउत्साहात संपन्न..!

बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य व गुणगौरव कार्यक्रमउत्साहात संपन्न..!

58

मसुरे प्रतिनिधी:   बांदिवडे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सर्व बांधील आहोत. येथील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन बांदिवडे देवस्थान नवीन मांडणी सदस्य आनंद परब यांनी येथे केले. नवीन मांडणी देवस्थान बांदिवडे यांच्या वतीने बांदिवडे गावातील अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महा गोंधळाचे औचित्य साधून शालेय वस्तू वाटप तसेच दहावी व बारावीतील प्रथम दोन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रिकेट प्रशिक्षक शाहूलखन बांदिवडेकर, पोलीस पाटील नरेश मसूरकर, संदेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रोख रक्कम दिलेल्या अनेक दात्यानी स्वतःचे नाव सुद्धा जाहीर करू नये अशी विनंती केल्याचे सांगून विश्वनाथ परब, चंद्रकांत परब यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आप्पा गोविंद परब, मधुकर परब, विश्वनाथ परब,प्रफुल्ल प्रभू,आनंद परब, चंद्रकांत परब, ग्रा सदस्य नारायण परब, सचिन परब, किशोर परब, साई प्रभूगावकर, तुषार परब, राजेंद्र सावंत,उदय परब, सदानंद परब, राजेंद्र परब, सचिन प्रभू, सागर परब, विजय प्रभू, शिवराम परब, प्रकाश परब, दिलीप तावडे, मनोहर परब, आबा आईर, दिनेश परब, यशवंत परब, विष्णू सावंत, नितीन परब, उल्हास परब,विनायक परब, कृष्णा कानू सावंत,राजेश अशोक परब, संतोष भगवान परब, उदय परब, पोलीस पाटील संदेश पवार, संजय परब, पांडुरंग गावकर, मोहन परब आदी उपस्थित होते.