Home सनातन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तुळसुली येथे आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तुळसुली येथे आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

63

कुडाळ: हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य सत् असत्, धर्म अधर्म याचा दैवी लढा आहे. यात जो सैनिक म्हणून उतरतो त्याचे कल्याण होणार आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी एक तास देण्याचा निर्धार करूया. हिंदू धर्म हा प्रत्येक जिवाच्या संरक्षणाची खात्री देतो. बांगलादेश सह अनेक महत्वाच्या लोकप्रतिनिधी, महत्वाच्या व्यक्तीवर हल्ले झाले आहेत तेव्हा त्यांनी हिंदूस्थानाचाच आश्रय घेतला. आज असंख्य हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचे एकमेव कारण हिंदू धर्माचरणापासून दूर जात त्याच्या धर्मभावना बोथट होत चालल्या आहेत चालल्या आहेत हेच आहे. जोपर्यंत या देशात हिंदू राष्ट्र स्थापन होणार नाही तोपर्यंत ही दयनिय स्थिती बदलणार नाही. असे प्रतिपादन अधिवक्ता सौ. कावेरी राणे यांनी कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय येथे आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलताना केले.

  हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तुळसुली येथे रविवारी हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेची सुरवात सद्गुरू श्री सत्यवान कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना अधिवक्ता सौ कावेरी राणे यांनी पुढे सांगितले की, हिंदू धर्माची शिकवण उदात्त आहे. ज्या धर्माची शिकवण इतरांचा विचार करणे अशी आहे तो इतरांवर अत्याचार करेल का? राष्ट्राचा आत्मा हा धर्म असतो ज्या राष्ट्रात धर्म नाही ते राष्ट्र अधोगतीला म्हणजेच त्याची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. आज हिंदू धर्मासमोर लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण,सांस्कृतिक जिहाद यासारख्या आक्रमणे आपल्या उरावर बसली आहेत. या सर्व संकटांवर मात करण्यासाठी आपल्या स्वधर्मावर प्रेम केले पाहिजे. स्वधर्माचे आचरण करून स्वधर्माचे शिक्षण घेतले पाहिजे.धर्माचरण व धर्म शिक्षण शिक्षण ही या आघातांवरील एकमेव उपाय योजना आहे . हिंदूंना याविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने धर्म शिक्षणाची केंद्र असलेली मंदिरेच शासनाच्या ताब्यात जात आहेत धर्मशिक्षण व चैतन्याचे स्त्रोत असलेली ही मंदिरे मानापमानावरून बंद ठेऊया नको. आज बांगलादेश मधील हिंदूंवर होणारे अत्याचार आपल्या जीवाला चटका लावून जातात ते आपल्याला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करत आहेत. आज विदेशातच नव्हे तर भारतातील पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये अशी भयानक स्थिती आहे. जो हिंदू धर्म सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो त्यांच्या बाबतीत अशा घटना का घडाव्यात. या अशा घटना पाहिल्यावर खरंच हा हिंदूंचा देश आहे का असा प्रश्न पडतो. हिंदूंना या देशातून बेदखल करण्यासाठी या देशातून परागंधा करण्यासाठी वक्फ कायद्याचा वापर केला जात आहे. हरिहरच्या घाटावर विदेशातील लोक श्रद्धेने श्राद्ध करतात. उद्या परदेशातील लोकांनी आपल्याला धर्म शिकवला तर ते आपल्याला लज्जास्पद वाटायला नको. ही वेळ यायला नको यासाठी आपण आपल्या मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे.बनारस येथे हिंदू विश्वविद्यालय आहे जेथे धर्म शिकवला जातो वेदांचा अभ्यास केला जातो. तेथे 50 टक्के विद्यार्थी हे परदेशी आहेत. त्यामुळे आता प्रत्येक मंदिरात धर्मशिक्षण वर्ग सुरू केले तर धर्मातील तेजाने तरूणवर्ग राष्ट्र व धर्मासाठी प्रेरीत होतील. यातून स्वधर्मावर प्रेम करून, आचरण करणे शिकून घेतले तर धर्माने नवचैतज्ञ तरूण वर्गात निर्माण होईल. धर्माचे आचरणच केले नाही तर त्यातील दैवी शक्ती आपल्याला कशी अनुभवता येणार? यासाठी प्राणप्रणाने धर्माचरण करूया. येणारा काळ प्रतिकूल आहे परंतु उपासनेचे व साधनेचे बळ वाढवले तर धर्माचा विचार नष्ट होऊ शकणार नाही. धर्माचरणाने धर्माची शक्ती वाढवुया. येणारा काळ फार कठीण आहे. भारत पाकिस्तान फाळणीचा इतिहास आठवला व सभोवतालच्या घटना पाहिल्यावर तोच काळ परत आला तर काय करणार? या काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेचे व उपासाचे बळ वाढवले पाहिजे. आज हिंदू तेजोहीन झाल्याने तो सगळीकडे मार खात आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. येणाऱ्या काळात संघटन हेच आपल्याला तारुन नेणार आहे.यासाठी हा जागृतीचा जागर या समिती च्या माध्यमातून करत आहे. समस्त हिंदू बांधवांचे कल्याण व्हावे या हेतूने आपण करत आहोत. जगामध्ये सर्वात मोठी युवाशक्ती या हिंदुस्थानात आहे. मात्र दुर्दैवाने बरीच युवाशक्ती व्यसनाच्या आहारी गेली आहे. हे चित्र पालटण्यासाठी आपण या धर्मकार्यात आपापल्या क्षमतेने सहभागी व्हायचे आहे. हा सत् असत्, धर्म अधर्म याचा दैवी लढा आहे. यात जो सैनिक म्हणून उतरतो त्याचे कल्याणच होणार आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी एक तास देण्याचा निर्धार करूया. असे सांगितले.