सावंतवाडी प्रतिनिधी: जग बदलत आहे तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण माणसांमधील नातेसंबंध अजूनही वागणुकीवरच उभे आहेत. ज्ञान असलेला विद्यार्थी पुढे जाऊ शकतो पण शिस्त आणि आदर असलेला विद्यार्थी टिकून राहतो. आजच्या विद्यार्थ्यांनी शिस्त आणि आदर संस्कृती प्रामाणिकपणा विश्वास जपायला हवा. हीच खरी त्यांच्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर शिक्षक आणि पालकांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणारा विद्यार्थीच पुढे चांगला जबाबदार नागरिक सुसंस्कृत माणूस म्हणून समाजाला आदर्श ठरेल तुमचे मार्कशीट वरील गुण. हे जरी महत्त्वाचे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि आदर भावना संस्कृती असणे गरजेचे आहे. तुम्ही देशभक्त विद्यार्थी बना. असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार,ॲड संतोष सावंत यांनी स्पष्ट केले. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉमर्स कॉलेज हे एक आदर्श कॉलेज आहे. या कॉलेजमधून आतापर्यंत सुमारे ९०० हून अधिक जण आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटून आहेत हेच या कॉलेजचे पंधरा वर्षातील मोठे योगदान आहे. अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
लोकमान्य ट्रस्ट चे सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स चे संकल्प २०२६ हा कार्यक्रम बहारदार असा झाला. या कॉलेजला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. पंधरा वर्षानंतर कॉलेजने नवा संकल्प केला आहे. या नव्या संकल्पचा दर्जेदार जल्लोषी वातावरणात कार्यक्रम झाला. हे कॉलेज आता स्वतःच्या जागेत भव्य दिव्य स्वरूपात पाहायला मिळणार आहे. या कॉलेजला पंधरा वर्षे पूर्ण होत आली आहेत. आता येत्या दोन वर्षात बिझनेस मॅनेजमेंट चे उच्च शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. असा संकल्प करण्यात आला आहे. गेल्या पंधरा वर्षात या कॉलेजच्या माध्यमातून जवळपास नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांनी बिजनेस मॅनेजमेंट चे शिक्षण घेऊन आज देशात विदेशात विविध कंपन्यांमध्ये शासकीय सेवेत नोकरी करत आहेत. असे हे कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले कॉलेज आहे. असे लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर यांनी अध्यक्षस्थानं बोलताना स्पष्ट केले.
कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझा बिल्डिंग मधील कॉलेजच्या हॉलमध्ये करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य ट्रस्टचे संचालक तथा संवाद तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, प्राचार्य यशोधन गवस आधी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॉलेज तर्फे प्रमुख पाहुणे ॲड संतोष सावंत व सचिन मांजरेकरयांचा शाल व श्रीफळ देऊन प्रवीण प्रभू केळुस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर प्रवीण प्रभू केसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार यशोधन गवस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड संतोष सावंत म्हणाले. तुम्हाला पुढील जीवनात जर मोठे व्हायचे असेल तर तुमच्या अंगी आदर आणि संस्कार विश्वास प्रामाणिकपणा असायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्ता आज आक्रमण करत आहे. अशा स्थितीत या ए.आय. च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात आपल्याला मार्कशीट मधल्या गुणांपेक्षा शिस्त आदर आणि संस्कार हेच महत्त्वाचे आहेत. याच गुणांवर विद्यार्थी भविष्यात टिकून राहून आणि असाच विद्यार्थी मोठा होऊ शकतो. तुम्हाला जर मोठे व्हायचं असेल तर संस्कार आदर शिस्त लहान मोठ्यांचे ऐकून घेण्याची वृत्ती कुठलेही काम करण्याची क्षमता तुमच्या अंगी यायला हवी आणि अशीच माणसे पुढील जीवनात करिअर करू शकतात. तुम्हाला विचारांचे सोने करायचे असेल तर लिहिता वाचता उत्तम यायला हवे त्यासाठी सातत्याने तुम्ही स्वतःलाच घडवत रहा. असे मौलिक विचार व्यक्त केले लोकमान्य ट्रस्ट देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स ची उंच भरारी कौतुकास्पद आहे या कॉलेजच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी घडले आहेत. तुम्हाला यशस्वी उद्योजक बनायचे असेल तर या कॉलेजमध्ये शिक्षण घ्या या कॉलेजचे सर्वेसर्वा किरण ठाकूर यांनी पहिले बिजनेस मॅनेजमेंट चे कॉलेज उभारून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला एक नवी दिशा दिली आहे. पुढील काळात निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे कॉलेज उच्च दर्जाचे असे उच्च शिक्षण देणारे आदर्श कॉलेज म्हणून याची ओळख सर्वदूर पोहोचणार आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणाला उत्तम वाव देऊन आपला मार्गक्रमण करायला हवा. असे ते म्हणाले
यावेळी लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक दालन लोकमान्य ट्रस्टचे सर्वेसर्वा किरण ठाकूर यांनी उभी केली आहेत. हॉटेल मॅनेजमेंट बीएड कॉलेज आणि बिजनेस मॅनेजमेंट अशी पद्धतीने मोठ्या शहराच्या धरतीवर या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचे कवाडे खुली केली आहेत. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी आपल्याच भागात शिकून करिअर करत आहेत. यापुढे निश्चितपणे हे कॉलेज भव्य दिव्य अशा स्वतःच्या जागेत उभे राहिलेले दिसेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर म्हणाले माझा तुम्ही सत्कार केला. विद्यार्थ्यांनी नेहमी काहीतरी करायला हवे. त्या दृष्टीने तुमच्या मार्गक्रमण करा असे स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी सन २०१० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले बिजनेस मॅनेजमेंट चे कॉलेज लोकमान्य ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. आज पंधरा वर्षे या कॉलेजला पूर्ण झाली आहेत. या १५ वर्षात जवळपास ९०० विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्शवत असे हे कॉलेज आहे. या कॉलेज चा वार्षिक स्नेहसंमेलन एक दर्जेदार स्वरूपात करण्याचा मानस आहे. निश्चितपणे यापुढे दर्जेदार आणि उत्तम असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील. उच्च शिक्षणाचे धडे या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा मानस आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्राध्यापक आनंद नाईक, साईप्रसाद पंडित, अस्मिता गवस, मेधा मयेकर, शैलेश गावडे, लेखा दुबळे आधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आदिती कळंगुटकर, आर्या वेळणेकर, उपस्थितांचे आभार दिव्या काकतकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये दर्जेदार असे संकल्प असा बहारदार कार्यक्रम केला त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. जनरल सेक्रेटरी सर्वेश नाईक व आदिती करंगुटकर. अमर धोंड . संतोष सावंत प्रवीण तू ये कर आधी कर्मचारी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली







