Home स्टोरी सेवा मानून घे आई..! श्री भगवती हायस्कुलच्या संगीत कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध.

सेवा मानून घे आई..! श्री भगवती हायस्कुलच्या संगीत कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध.

65

मसुरे प्रतिनिधी:  देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी जत्रोत्सवामध्ये येथील श्री भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीत कार्यक्रम करत उत्सवातील कार्यक्रमाला चार चांद लावले. सूर ताल आणि लय याचा अपूर्व संगम झाल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. प्रशालेचा विद्यार्थी जय सावंत याने ‘सात स्वरांनी केली प्रार्थना’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्या नंतर आयुष कांदळगांवकर याने ‘सेवा मानून घे आई’ हे गीत, भूमी आइर हिने ‘विठ्ठ माऊली माऊली जगाची ‘ हा अभंग, हर्ष जोशी याने ‘देवाजीचे द्वारी आज रंगला अभंग,’ लिशा तेली हिने ‘मळवट’, शमीका जाधव हिने ‘अवघे गरजे पंढरपूर’, दक्षेश मांजरेकर याने ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा’ हे दत्त गीत सादर केले..संस्कृती सारंग हिने ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव’, आराध्या कदम हिने ‘बा विठ्ठला धाव पावरे’, अनन्या गावकर हिने ‘आई भवानी तुझ्या कृपेने’ हे गोंधळ गीत सादर केले.

सानवी दळवी हिने ‘स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त’ हे भक्तीगीत सादर केले. समिक्षा हिंदळेकर हिने ‘बघ उघडुनी दार’,चैतन्य रूपे याने ‘स्वामी रंगी न्हाऊनीया स्वामीमय झालो’, जय सावंत याने ‘शोधी सी मानवा’, लिशा तेली हिच्या ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा’ या देवीच्या गोंधळ गीताने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे निवेदन कलाशिक्षिका सौ. गौरी तवटे यांनी खुमासदार शैलीत केले. सदर संगीत कार्यक्रमाला संगीत साथ प्रसिद्ध भजन सम्राट राजेंद्र प्रभू यांनी हार्मोनियम तर संगीत विशारद शैलेश सावंत यांनी तबला साथ दिली. कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, कला शिक्षिका सौ गौरी तवटे, शिक्षक प्रसाद बागवे यांची होती. त्यांना हरिदास महाले, रश्मी कुमठेकर, सुविधा बोरकर, तेजल बागडे यांचे सहकार्य लाभले. श्री भगवती देवस्थान ने संगीत कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ दिल्याने प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले. देवस्थान कडून श्रीफळ भेट देत सर्वांचा सन्मान करण्यात आला.