मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी केले. मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार वितरण मसूरे येथील आर पी बागवे हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार गणेश गांवकर (स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), सुधीर पडेलकर (स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार) प्रशांत हिंदळेकर (बेस्ट स्टोरी अवॉर्ड, मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) आणि डॉ. ज्योती रविकिरण तोरसकर (मालवण रत्न पुरस्कार) श्री निलेश गवंडी (कला रत्न पुरस्कार) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला.

पत्रकार समिती सदस्यांसाठी गणेश सजावट स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती. यातील विजेते नितीन गावडे (प्रथम क्रमांक), भूषण मेतर (द्वितीय), प्रफुल्ल देसाई (तृतीय), केशव भोगले (उत्तेजनार्थ प्रथम), मनोज चव्हाण उत्तेजनार्थ द्वितीय), अर्जुन बापर्डेकर (उत्तेजनार्थ प्रथम) यांचा सुद्धा सन्मान झाला.

पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या पत्रकार महेश सरनाईक, मुख्याध्यापिका शुभांगी अमित खोत, पोलीस पाटील प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रम झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक (मुळीक) परब, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी उपस्थित होते. मालवण पत्रकार समितीची वाटचाल विविध समजपयोगी कार्यक्रमानी चालू आहे. मालवण मध्ये पत्रकार भवन उभारण्याचा संकल्प यावेळी अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी प्रस्ताविक करताना व्यक्त केला. तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले , मालवण तालुक्यात हजर झाल्या नंतर माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मालवण तालुक्यात काम करताना पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकांभिमुख काम करण्याचा आपला प्रयत्न राहील. मालवण तालुका प्रशासकीय दृष्ठ्या चांगला तालुका करण्याचा आपला प्रयत्न पुढील काळात असेल. उद्योजक डॉ दीपक परब म्हणाले, मालवण पत्रकार समितीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून वेगळा संदेश सर्वांना दिला आहे. शून्य शिक्षिकी शाळा प्रश्न , आणि मर्डे ग्रामपंचायतचे नाव पूर्ववत मसूरे करावे अशी मागणी केली. कार्यक्रम आमच्या हायस्कुल मध्ये आयोजित केल्या बद्दल आभार मानले. बिडीओ शाम चव्हाण म्हणाले, प्रशासनात पत्रकारांचे चांगले सहकार्य असते. पत्रकार संघाकडून सन्मान होणे म्हणजे मोठा सन्मान आहे. यापुढेही प्रशासनाला चांगले सहकार्य पत्रकारांचे लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. वंचित घटकाना न्याय देण्याचे काम पत्रकार करत आहेत. ज्योती तोरस्कर म्हणाल्या, आज विध्यार्थी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला गेला आहे हे उल्लेखनीय कार्य आहे. आध्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यानी त्या काळात समाजाला दिशा देण्याचे काम केले होते. तेच काम आज मालवण तालुक्यातील सर्व पत्रकार करत आहेत.मसूरे गावाला मोठा इतिहास आहे. हा इतिहास संकलित व्हावा असे आवाहन केले. पुरस्कार प्राप्त निलेश गवंडी म्हणले , कला ही माणसाला जीवन जगण्यास शिकवते. मला लाभलेल्या मार्गदर्शकांचे मी आभारी आहे. या पुरस्काराचे सर्व श्रेय मी माझ्या सहकाऱ्याना आणि रसिकाना देतो
यावेळी मसूरे मंडळ अधिकारी श्री शिंगरे, ग्रामसेवक श्री मगम, डॉ विश्वास साठे, शिवाजी परब, विलास मेस्त्री, पत्रकार नंदकिशोर महाजन,समीर म्हाडगूत, विशाल वाईरकर, मनोज चव्हाण, राजेश पारधी, कुणाल मांजरेकर, अमोल गोसावी, अर्जुन बापार्डेकर, संदीप बोडवे, सौगंध बादेकर, परेश सावंत, नितीन गावडे, उदय बापर्डेकर, अनिल तोंडवळकर, शैलेश मसूरकर, झुंजार पेडणेकर आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन संग्राम कासले, आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.







