Home शिक्षण शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच...

शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच महत्त्वाची आहे..! सचिन सावंत.

207

सावंतवाडी प्रतिनिधी: आपण आपल्या गावच्या मराठी भाषेच्या शाळेत शिकलो आणि मोठे झालो. तर ते फार अभिमानाचे आहे. तेव्हा आज पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या गावच्या मराठी माध्यमांच्याशाळेमध्येच शिकून आपण कसे मोठे होऊ? एमपीएससी यूपीएससीच्या धरतीवर स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल आणि शासकीय सेवेत उच्च पदावर जर आपल्याला जायचे असेल तर निश्चितपणे गावची शाळाच महत्त्वाची आहे. या शाळेचा अभिमान आपल्याला जेव्हा आपण पुढील जीवनात प्रवेश करू तेव्हाच खऱ्या अर्थाने वाटेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण शिकून काय व्हायला हवे हे आत्ताच मनाशी बाळगा. आंबेगाव कुणकेरी या गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावच्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतच शिकायला हवे तरच तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की मी माझ्या गावच्या शाळेत शिकून मोठा झालो. हाच आपल्या पुढील आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल असे मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत यांनी स्पष्ट केले. कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा मेकॅनिकल इंजिनियर सचिन सावंत व अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर दीपक सांगेलकर, लोकसेवा संघ संस्थेचे सचिव उत्तम सराफदार, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राजन मडवळ, शाळा समिती सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम परब,  प्राथमिक शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक तथा साहित्य मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार,  ग्रामस्थ सखाराम कुंभार, श्री एन. घाटकर,  श्री अनंत सावंत,  मुख्याध्यापक सौ अर्चना सावंत, सुनील सावंत आधी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री सावंत पुढे म्हणाले आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल व तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करून गावातीलच शाळेत शिकणे फार महत्त्वाचे आहे. आजच्या युगात तुम्ही वेळ आणि शिक्षण याचा योग्य ताळमेळ घातला तर तुम्ही स्पर्धात्मक युगात टिकू शकाल. आपण ज्या परिसरात गावात राहतो त्या ठिकाणीच आपल्याला उत्तमरित्या शिक्षणाचे धडे मिळू शकतात. गावातील शाळा हीच खरी विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाची एक दिशा देणारे केंद्र आहे. आतापर्यंत अनेक जण आपल्या अवतीभवती असलेल्या गावातीलच शाळेत शिकून मोठे झाले आहेत. त्यामुळे आज कितीही बदल झाला तरी शहरीकरणाचे आणि अनेक माध्यमांचे फॅड आले तरी गावची शाळा टिकायला हवी.. आंबेगाव कुणकेरी गावचा विकासाचे केंद्र म्हणजे शाळा आहे आणि ही शाळा आपण सर्वांनी टिकवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अभिमान बाळगायला हवा तुम्ही दहावीनंतर पुढे काय करणार आहात? इंजिनिअर डॉक्टर शासकीय सेवा किंवा शिक्षक काय होणार? हे तुम्ही आत्ताच निश्चित करा. आपण गावच्या शाळेत शिकायला हवे. कारण आपल्या अवतीभवती काय आहे? हे गावच्या शाळेत शिकूनच कळते शहरीकरणाच्या शाळेत जाऊन आपला वेळ पैसा खर्च जातो. त्यामुळे गावची शाळा हीच महत्त्वाची आहे. मी या गावच्या शाळेत शिकूनच मोठा झालो. या गावातील अनेक जण मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेत शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झालेत. मग तुम्ही आता तुमच्या गावच्या मराठी भाषेच्या शाळेतच शिका आणि हाच खरा तुमचा पुढील काळातील अभिमान असेल. असे ते म्हणाले.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन. त्यांचा सन्मान गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षा स्तनावरून बोलताना सामाजिक कार्यकर्ते दीपक सांगेलकर यांनी विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे आणि तुमच्या आयुष्याची दिशा निश्चित करा आणि मोठे व्हा. यावेळी शाळेच्या संस्थेचे सचिव उत्तम सराफदार यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला हवा आणि तुमच्या यशाची किनार तुम्ही अधिक गतिमान करायला हवी.संस्था आणि शाळा आणि पालक तुमच्या सदैव पाठीशी आहेत. तुम्ही फक्त उत्तम शिका आणि मोठे व्हा. असे ते म्हणाले.

यावेळी शाळेच्या वतीने सचिन सावंत व दीपक सांगेलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सचिव उत्तम सराफदार यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी आज गावातील मराठी शाळा विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खरंतर आपल्या गावातील मराठी शाळा हा गावच्या विकासाचे एक केंद्र आहे. गावच्या शाळेत तुम्हाला मुक्तपणे शिक्षणाचे धडे गिरवता येतात. त्यातून तुम्ही पुढील काळात एक उत्तम आदर्श सुसंस्कृत व्यक्ती म्हणून तुमची गणना होते. या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर आम्ही क्रीडा सांस्कृतिक सामाजिक अध्यात्मिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहोत. पालक व आजी-माजी विद्यार्थ्यांनी  शाळा अधिक प्रगत करण्यासाठी तुमचे सहकार्य कायम राहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया मेस्त्री, वार्षिक अहवाल वाचन अनुष्का सावंत, उपस्थितांचे आभर आर्या सावंतयांनी केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोकरे,  शिक्षक श्री राऊळ, मिथिलेश राणे, श्रीमती सावंत, श्री गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.