Home स्टोरी हृदयरोगग्रस्त मुलावर मुंबईत येथे यशस्वी शस्त्रक्रिया.!  आर. बी.एस. के. अंतर्गत मिळाले उपचार.

हृदयरोगग्रस्त मुलावर मुंबईत येथे यशस्वी शस्त्रक्रिया.!  आर. बी.एस. के. अंतर्गत मिळाले उपचार.

120

सावंतवाडी: जन्मतः हृदयरोग असलेल्या १० महिन्याच्या मुलाच्या आयुष्यात आता नवे सूर उमटले आहेत. राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत वेळेवर निदान, समुपदेशन आणि शासन सहकार्यामुळे मुंबई येथे शौर्य जाधव राहणार आपट्याचे गाळू, सावंतवाडी याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

Rbsk कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी आरोग्य तपासणी वेळी सदरील बालकाला हृदयरोगसाठी संदर्भित करण्यात आले. 2D echo मध्ये निश्चित झाल्यावर बालकास गृहभेट देऊन समुपदेशन करण्यात आले. यावेळी Rbsk जिल्हा पर्यवेक्षक श्री पारधी सर, सावंतवाडी पथकातील डॉ. निलेश अटक, डॉ बुवा निर्माल, श्री थोडे करेक्शन सर पहिली लाईन मुंबई येथे डॉ. बुवा, औषधनिर्माता श्री पडते, आरोग्यसेविका मोहिनी जाधव, CHO डॉ. डवरे, अंगणवाडी सेविका सौ.शोभा सावंत, आरोग्यसेविका चव्हाण, आशा. सौ चव्हाण यांनी मुंबई येथील RBSK MOU प्रतीक बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई येथे संपर्क केला व  शौर्य जाधव याला पाठविण्यात आले.

या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सदरील बालक याची पुन्हा वेळोवेळी गृहभेट देऊन तपासणी करण्यात आली. आता बालकाची वजन, उंची वाढ उत्तम प्रकारे आहे. शस्त्रक्रिये नंतर फॉलो up 2 d echo कुडाळ येथील जिल्हास्तरीय शिबिरात करण्यात आली. पालकांनी सर्वांचे आणि शासनाचे खूप आभार मानले. तसेच या शस्त्रक्रियेसाठी विशेष मार्गदर्शन लाभलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले.