Home क्राईम सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री? पोलीस प्रशासनाचा दुर्लक्ष.

सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री? पोलीस प्रशासनाचा दुर्लक्ष.

129

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री सुरु असल्याची माहिती मिळत आहे. हा गांजा विक्री करणारा व्यक्ती संध्याकाळच्या सुमारास त्या कॉलेज परिसरात स्वतःचा स्नॅक्स, फास्टफूड चा स्टॉल चालवतो. हा स्टॉल. म्हणजे फिरता स्टॉल असून संध्याकाळी त्या परिसरात रोज लावला जात नाह. पोलीस तपासाची चाहूल लागल्यास हा व्यक्ती स्टॉल त्या परिसरात आणत नाही. ज्यावेळी स्टॉल असतो त्याच स्टॉलच्या मागे स्वतः ची फोरव्हिलर गाडी पार्क करतो. याच गाडीमध्ये गांजा आणि ड्रग्जचा साठा ठेवलेला असतो. ठरलेल्या ग्राहकांना त्यांच्या ईशाऱ्यानुसार त्या कार गाडीतून गांजा आणि ड्रग्जचा पुरवठा होतो.  हा फास्ट फूड स्टॉल मालक रात्री ८ नंतर स्वतः पूर्णपणे नशेमध्ये असल्याचे दिसून येतं.

गेल्या काही दिवसात याबाबत जागरूक नागरिकांनी याबाबत पोलीस प्रशासनाला फोन करून माहिती दिली असल्याचे समजते. मात्र पोलिसांनी अद्यापतरी घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून हा हा गांजा विक्री करणारा व्यक्ती नेमका कोण आहे? तसेच संबंधित माहिती सत्य आहे काय? याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. त्यामुळे याबाबत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जबाबदार व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.