सावंतवाडी: कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेतील चतुर्थ वर्ग कर्मचारी विलास आत्माराम ठाकूर यांचे आज शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. गेले काही महिने विलास ठाकूर आजारी होते. शिपाई विलास ठाकूर यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारात तसेच कळसुलकर इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यात शोकाकुल वातावरण आहे. शिपाई विलास ठाकूर यांच्या निधनामुळे यांच्या दुःखद निधनामुळे शाळेच्या मुख्याद्यापकांनी आज शाळेला सुट्टी घोषित केली आहे. तसेच आज ५ डिसेंबर रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेतील सर्व काम बंद ठेवण्यात आले आहे.







