Home स्टोरी मसुरेचे राजेश मेस्त्री वक्तृत्व स्पर्धेत प्रथम…!

मसुरेचे राजेश मेस्त्री वक्तृत्व स्पर्धेत प्रथम…!

102

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र श्री राजेश वसंत मेस्त्री यानी सतर्कता जागरूकता वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री मुदगेरीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी संपूर्ण संचालक मंडळ व मुख्य सतर्कता अधिकारी, भारत सरकार हे देखील उपस्थित होते.

श्री राजेश मेस्त्री हे आरसीएफमध्ये अधिकारी श्रेणीत वरिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असून त्यांना 2015 साली महाराष्ट्र शासनाचा बहुप्रतिष्ठित असा “गुणवंत कामगार पुरस्कार” कामगार मंत्र्यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला आहे. तसेच 2016 साली त्यांना “सर्वोत्कृष्ट कर्मचारी” पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने दोनवेळा अंतराष्ट्रीय सुवर्णचषक तैवान व कोलंबो येथे जिंकले आहेत. अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार तसेच महाराष्ट्र टाइम्स तर्फे दोनदा उत्कृष्ट सिटीझन रिपोर्टर पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. मसुरे देऊळवाडा येथील संतोष मेस्त्री यांचे ते भाऊ होतं. राजेंह मेस्त्री यांचे अभिनंदन होतं आहे.