Home स्टोरी म्हसळयांत बिबट्याचा संचार! मालकी जागेत जागो-जागी लागणारे वणवे ठरत आहेत कारण.

म्हसळयांत बिबट्याचा संचार! मालकी जागेत जागो-जागी लागणारे वणवे ठरत आहेत कारण.

409

म्हसळा प्रतिनिधी (संजय खांबेटे): म्हसळा तालुक्यात सुमारे५२२१ हेक्टर क्षेत्रांत वनसंपत्ती आहे. त्यात बऱ्यापैकी वन्य प्राणी ,श्वापदे, औषधी वनस्पती मोठयाप्रमाणावर आहेत.काल शनी सायंकाळी ४ चे दरम्यान बिबट्याचे दर्शन म्हसळा- देवघर कोंड- कुडतोडी या निर्मनुष्य रस्त्यावर  म्हसळ्यापासून ८ कि.मी. अंतरावर स्थानिक युवा बागायतदार मनीष संतोष चाळके याना झाले, मनिष म्हसळ्याहून आपल्या गावी कुडतोडी येथे जात होता , बिवट्या देवघर कोंड रस्त्याच्या वरील बाजूस वन विभागाच्या काजुचा माळ  या भागांत सस्त्याच्या मधोमध निवांत बसलेला आढळला. मनिषने  तात्काळ आपल्या मोबाईल मध्ये बिबटयाचा संचार कैद केला. मनिषने या परिररांत अद्यापही एक मोठा बिबटया असून त्याचेही अनेक वेळा दर्शन होत असते असे सांगितले. मौजे कुडतोडी, देवघर,देवघर कोंड या परिसरांतील ग्रामपंचायतीच्या – वाडी वस्तीवर नागरिकाना सर्तक ते चा इशारा दिला असून,रात्रीच्या वेळी जंगलात एकटे न फिरणे, जनावराना (गाय- बैल)एकटे न सोडणे याबाबत जनजागृती केली आहे.

प्रविण शिंदे . वनपाल चिचोंडा.”बिबट्या हा निशाचर शिकारी आहे. त्याला त्याच्या शिकार झोनमध्ये लहान, शाकाहारी प्राण्यांची शिकार करायला आवडते. त्यामध्ये ससा, हरिण, भेकर, माकड आणि रानडुक्कर यांचा समावेश आहे तर बिबट्यां इतर परजीवींचीही शिकार करतो ग्रामिण भागांतील पाळीव कुत्र्यांचे मांस खाण्यात तो आनंद घेतो. ते अतिशय धूर्तपणे मानवी वस्तीकडे जातात, बिबट्या सहसा रात्री शिकार करतात. बिबट्या ५६ ते ६० किमी/ प्रती तास या वेगाने धावू शकतात.””फेब्रुवारी ते मार्च १५ पर्यंत मालकी (खाजगी) क्षेत्रात एकूण १८ वणवे व फाॅरेस्ट क्षेत्रात ९ वणवे लागले आहेत.वन खात्याचे २५ हे.क्षेत्र वणव्यात बाधीत झाले आहे  खाजगी मालकी क्षेत्रांत नेवरुळ, म्हसळा,वरवटणे,घुम,पानवे,जांभूळ, कोळे,केल्टे,पानदरे, आंबेत, मरयामखार , कुडतुडी, निगडी आशा गावांतून  खाजगी क्षेत्रांत वणवे लागले आहेत. ते जंगली श्वापदांसाठी घातक आहेत. कोलवट, वरवटणेघुम,पानवेजांभूळ,तोराडी,पांगळोली, कुडगाव,मोरवणे इत्यादी गावातून वणवे लागल्याच्या नोंदी आहेत यामुळे जंगलातील श्वापदे सुरक्षीत आणि खाद्य (आपली शिकार) याचे जवळ पास वास्तव्य करतो.

माहितीजनार्दन सुर्यवंशी. सेवानिवृत D.F.0