Home स्पोर्ट पलावा योग परिवार आयोजित नारी इन सारी मॅरेथान स्पर्धा उत्साहात संपन्न!

पलावा योग परिवार आयोजित नारी इन सारी मॅरेथान स्पर्धा उत्साहात संपन्न!

240

मसुरे प्रतिनिधी: आदरणीय वीरमाता झाँशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून पलावा योगपरिवाराने नारी इन साडी या तीन किमी व पाच कि.मी. धावणे ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेसाठी पलावातील १८ ते ७० वयोगटातील १८० माताभगिनी पारंपरिक नऊ वारी साडी, मुंडासे, ढाल-तलवार तसेच भाले स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेला एका उंचीवर नेत स्पर्धा यशस्वी केली.

आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन रवी चौव्हाण, के. एन. सिंग (नेव्ही ), अशोक दाभोलकर (रेल्वे), निकेत सिंग, श्रीमती विणा चौव्हाण तसेच श्रीमती अनिता वाजपेयी उपस्थित होत्या. त्यांचे शुभहस्ते विजेते तसेच सहभागी महिलाना पुरस्कार तसेच मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले.

नारी इन सारी हा उपक्रम राबवताना श्री. आनंदसरांच्या मार्गदर्शनाखाली पलावा योग परिवारातील सर्वश्री जालिंदर, दिनेश, सागर,अक्षय, अमित, स्वरुप, विनायक, पुष्पराज, मंगेश, अंकुश, अजय, केतन, नंदलाल, प्रदिप, महेन्द्र, अनुराग, डॉ. विजय, मुकेश एम., सुनील, पी.एन.गुप्ता, भार्गवी, भावार्थ, लविशा, श्रेयांश, अद्वीता, जेनिका, आरती, जेविका, सोनिया, भूमी, स्विकृती, हेमा, उदिता, हितेंद्र, शोभीत, सुनिल अंकल, फातिमा आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.