मसुरे प्रतिनिधी: रामगड पोस्ट ऑफिस मधे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडली असल्याबाबत जिल्हा डाक निरीक्षक निशांत शुक्ला यांचे रामगड सरपंच शुभम मटकर व ग्रा प सदस्य अमित फोंडके यांनी लक्ष वेधले.
रामगड गावामधील पोस्ट ऑफिस मधे पूर्वी बीएसएनएल ची इंटरनेट सेवा होती त्याच्या अनिमियतेबाबत तक्रारी करून त्याबाबत ग्रामपंचायत रामगड मार्फत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर पीओसीबी यंत्रणेसाठी खाजगी पुरवठादार नेमून इंटरनेट सुविधा पूर्ववत झाली मात्र या नविन यंत्रणेची सुविधा पूर्णपणे सुरू झाली नसून ग्रामस्थांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
रामगड पोस्ट ऑफिस मधे पंचक्रोशी मधील ग्रामस्थ येत असून ही सुविधा लवकर पूर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन पोस्ट विभागाकडून देण्यात आले.







