Home स्टोरी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना स्वेटर आणि मिठाई...

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना स्वेटर आणि मिठाई वाटप.

49

सावंतवाडी प्रतिनिधी: इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना दिवाळी भेट म्हणून स्वेटर तसेच मिठाई देण्यात आली. सावंतवाडी नगरपालिकेच्या या सफाई कामगारांना गेल्या सहा वर्षांपासून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या भेटवस्तू आणि मिठाई देण्यात येते.

यावर्षी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या या कामगारांना स्वेटरचे वितरण करण्यात आले. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वर्षभर काम करणाऱ्या या कामगारांना आपली आठवण ठेवून कोणीतरी आपल्याला दिवाळी भेटवस्तू देत आहे या गोष्टीचा आनंद त्यांच्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. तर या उपक्रमामुळे आपण कोणालातरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणि समाधान इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा मृणालिनी कशाळीकर, सेक्रेटरी भारती देशमुख, खजिनदार देवता हावळ, संपादक नेत्रा सावंत, अनिता भाट, दर्शना रासम, शुभदा करमरकर, वैभवी शेवडे, सुहानी तळेगावकर, दर्शना बाबरदेसाई, सायली दुभाषी, निता रेडीज, मिनल नाईक आदी उपस्थित होत्या.