सावंतवाडी प्रतिनिधी: गेली ५० वर्ष माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय मंडळ उत्तम प्रकारे वाचन चळवळ पुढे नेण्याचे काम करत आहे. जुन्या जाणत्या व्यक्तींनी हे ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयाचे काम वाखाण्याजोगे आहे. या गावातील लोक निश्चितच चांगल्या दर्जाचे आहेत. त्यामुळेच हे ग्रंथालय एवढी वर्ष उत्तम प्रकारे चालत आहे. हे ग्रंथालय पुरस्कार प्राप्त ग्रंथालय आहे. पुढील काळात राज्यस्तरीय ग्रंथालय पुरस्कार या ग्रंथालयाला मिळावा यासाठी प्रयत्न करा. अशा शब्दात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी स्पष्ट केले. निश्चितपणे जिल्हा ग्रंथालय संघ तुमच्या या ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीबाबत समाधानी आहे. अशीच ग्रंथ चळवळ आणि मराठी भाषा व्यापकतेने वाढवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असे वैद्य यांनी स्पष्ट केले. माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय मंडळ माजगाव सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळा ग्रंथालय सभागृह नंबर एक शेजारी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, राज्यस्तरीय ग्रंथपाल पुरस्कार विजेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लेखक प्रवीण बांदेकर, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, सरपंच रिचर्ड डिमेलो, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष दीपक पटेकर,, माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत. शिवसेनेचे उपनेते तथा माजी सभापती अशोक दळवी, ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र पटेल, सामाजिक कार्यकर्ते संजय कानसे आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दहावी तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व ग्रंथालयाच्या वतीने तसेच गेली पन्नास वर्षात या ग्रंथालयाला सहकार्य केलेले गावातील व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य, ज्येष्ठ लेखक साहित्यिक प्रवीण बांदेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड संतोष सावंत, ॲड शामराव सावंत, ॲड सचिन गावडे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, मुख्याध्यापक चौरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गायकवाड, श्री बांदेकर, कॅप्टन प्रेमानंद सावंत, प्रभाकर सावंत, आर. के. सावंत, मधु कुंभार आदींचा सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते श्री अनंत वैद्य म्हणाले कि, गावात ग्रंथालय चळवळ चालवणे खूप कठीण आहे. परंतु माजगाव सारख्या गावाने अदर्जाच्या धरतीवर हे ग्रंथालय उत्तम प्रकारे चालवत आहेत. या ग्रंथालयाने युवा व बाल वाचक निर्माण करावेत. असे ते म्हणाले. यावेळी जेष्ठ लेखक व साहित्यिक प्रवीण बांदेकर म्हणाले ग्रामीण भागात ग्रंथालय चालवणे फार कठीण आहे. पण गेली ५० वर्ष उत्तम प्रकारे माजगाव गावात ग्रंथालय सुरू आहे. ही आनंदाची बाब आहे. येथील लोकांनी वाचन चळवळ आणि साहित्य निर्माण व्हावे. यासाठी गावात सुरू केलेले हे ग्रंथालय आज पन्नास वर्षाचे झाले आहे. अजून शंभर वर्ष हे ग्रंथालय एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी साहित्यिक लेखक उत्तम प्रकारे समाज कार्य करणारी व्यक्ती या गावाने घडवली आहेत. हा गाव एक आदर्श गाव आहे. असं ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विक्रांत सावंत म्हणाले पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथालयाला आपल्या माध्यमातून निश्चितपणे सहकार्य केले जाईल. गावच्या विकासाचे हे ग्रंथालय एक केंद्र आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळेच हे ग्रंथालय आज वेगळ्या धर्तीवर पाहायला मिळत आहे. अशा शब्दात कौतुक केले. यावेळी दीपक पटेकर आदिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काव्य मांजरेकर हिने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कासार तर प्रस्ताविक संस्थेचे सचिव सतीश मालसे व पन्नास वर्षाच्या कामकाजाचा आढावा सौ सावंत यांनी मांडला.







