Home स्टोरी कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे...

कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य. 

123

सावंतवाडी: कारिवडे साई सुरभी हॉटेल वळणावर आज सकाळी सात वाजता मोटरसायकल व कॅन्टर या दोघांमध्ये अपघात झाला रस्त्याचा अंदाज चुकल्याने कागल कन्नूर येथील ओमकार अंकुश जगताप वय 25 याने कॅन्टरला मागून जोरदार धडक दिली व तो रस्त्याच्या बाहेर फेकला गेला याची तत्काळ माहिती एसटी कर्मचारी बी एल कासार यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांचे रवी जाधव यांनी तेथील ग्रामस्थ व 108 च्या मदतीने त्या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्याला,हाताला, पायाला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या नातेवाईकांना याची कल्पना दिली परंतु कागल वरून नातेवाईपर्यंत तीन तास होणार होते त्यामुळे नातेवाईकांची वाट न पाहता अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे त्या युवकाला नेण्यासाठी जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी स्वीकारली.