Home स्टोरी मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघाची सभा संपन्न.

मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघाची सभा संपन्न.

165

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ ग्रंथालय आहेत. ही सर्व ग्रंथालय नवीन तंत्रज्ञानानुसार अद्यावत अशी वेबसाईट जिल्हा ग्रंथालय संघाची तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावागावातील ग्रंथालय एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जिल्हा ग्रंथालय संघ च्या माध्यमातून येत्या वर्षभरात ग्रंथालय संघाचे सर्व उपक्रम अद्यावत पद्धतीने पोहोचवले जाणार आहेत. असा निर्णय जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघची वार्षिक बैठक कुडाळ येथील राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय ग्रंथालय संग्रहालय च्या सभागृहात जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

यावेळी जिल्हाग्रंथालय संघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिटो यांना राजधानी कवी पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचा मिळाल्याबद्दल तसेच राज्य ग्रंथालय संघाचा ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाला. संजय शिंदे व जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मंडळावर निवड झाली. त्याबद्दल या तिघांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माझी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी आता ग्रंथालय चळवळ अधिक व्यापक व्हायचे असेल तर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाने आपापल्या भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना बाल साहित्यिक निर्माण करायला हवेत. जिल्हा ग्रंथालयाने नव्या तंत्रज्ञानानुसार सर्व ग्रंथालय चळवळी विषयीची माहिती व संघाच्या उपक्रमांची माहिती असणारी वेबसाईट तयार करावी आणि याद्वारे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व ग्रंथालय व सदस्यांना त्याची सर्व माहिती उपलब्ध होईल. असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी येत्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ नव्या तंत्रज्ञानानुसार अद्यावत असे वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा ग्रंथालयाचे सचिव राजन पांचाळ यांनी या वर्षापासून जिल्हा ग्रंथालय संघाची सभासद वर्गणी मध्ये बदल करण्यात आला आहे. नव्याने अ वर्ग ग्रंथालयांसाठी २५० रुपये, ब ग्रंथालय २०० रुपये,  क वर्ग १५० रुपये व ड वर्ग ग्रंथालय १०० रुपये, व्यक्ती सभासद ५०० रुपये आणि कर्मचारी सभासद ५० रुपये होऊन नवीन सभासद करण्याचे निश्चित करण्यात आले. असे स्पष्ट केले. या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार वितरण साठी समिती गठीत करून त्याद्वारे आदर्शवत ग्रंथालय व कर्मचारी यांचा गौरव करून ग्रंथालय चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सर्वांच्या अपेक्षित आहेत असे ठरवण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक धाकू तानावडे, ॲड संतोष सावंत, सतीश गावडे, प्रसाद दळवी, विजय भोगटे, सौ. दिपाली का जरेकर, विजया पाटकर, निलेश तळेकर, रमाकांत केरकर, जयद्र तळेकर, सिताराम परब, केदार सामंत, विजय सावंत, गुरुनाथ पावरे आधी उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही चर्चा करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक प्रभाकर सावंत यांनी २१ हजार रुपयाची मदत देणगी जिल्हा ग्रंथालय संघाला दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मालवण तारकर्ली या ठिकाणी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आभार श्री तानावडे यांनी मानले.