मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील पावणाई दूध उत्पादक ही संस्था नेहमी येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. दूध उत्पादनातून मसुरे येथे खऱ्या अर्थाने दूध क्रांती झाली आहे. यापुढेही शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करून देऊन या संस्थेच्या वतीने सर्व ते सहकार्य केले जाईल असे मसुरे येथे बोलताना डॉक्टर विश्वास साठे यांनी व्यक्त केला.
पावणाई देवी दूध उत्पादक संस्था मसुरे यांच्या वतीने मसुरे येथे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा आणि या शेतकऱ्यांना पावणाई देवी महिला दूध उत्पादन संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते या संस्थेच्या सुमारे 100 दूध उत्पादन करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप वितरित करण्यात आले.

यावेळी चुनवरे येथील प्रसिद्ध दूध उत्पादक प्रल्हाद परब, या संस्थेच्या अध्यक्षा सौ अलका साठे,हेमंत बागवे,तात्या बागवे,अनिल सावंत, अजित म्हाडजूत, श्री सागवेकर,श्री सावंत, गणेश परब, सतीश बांदिवडेकर, सोहम सावंत, सुरेश मापारी, रमेश पाताडे, पांडुरंग ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मुबारक मीर, अमोल बागवे, सिध्देश मसुरकर, राकेश चव्हाण, शाम सावंत, संतोष राणे, प्रशांत माने, तात्या परब, श्री वंजारे, प्रतिक परब, मारुती सावंत, वैभव बांदिवडेकर,जयप्रताप बांदिवडेकर,सुमित सावंत, चंद्रकांत चव्हाण, किरण पवार, संदेश पवार, श्री हिरलेकर, श्री वराडकर, अवि घाडी, अजय घाडी, सचिन बागवे, निलेश लोके, प्रल्हाद परब राहुल मेस्त्री, अमोल धुरी, प्रसाद लाड, श्री. पुजारे, सुधीर घाडी,श्री. भावे, निलेश गाडी,श्री. मालडकर, नारायण परब, सुरेश मेस्त्री, चेतन परब, श्री. तेंडुलकर, तुळशीदास चव्हाण आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध दूध उत्पादक प्रल्हाद परब म्हणालेत शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय करताना कमी दुधाळ जनावरे घेऊन व्यवसाय सुरू करावा आणि त्यातूनच पुढे आपली आर्थिक उन्नती साधावी. बाहेरच्या राज्यातून दुधाळ जनावरे आणताना ती नीट पारखून आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेऊनच आणावीत. आपल्या जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता असून याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही गरजेचे आहे. यावेळी येथील शेतकऱ्यांनीही दूध उत्पादन संदर्भात विविध प्रश्न मान्यवरांना विचारून याबाबत माहिती प्राप्त करून घेतली. कार्यक्रमाचे आभार पांडुरंग ठाकूर यांनी मानले.







