Home स्टोरी भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील मुलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ...

भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील मुलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा..! रवींद्र मडगावकर यांचे आवाहन.

235

सावंतवाडी प्रतिनिधी: विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विषयाची वगळून) उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी अशा योजनेचा लाभ मा पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे आंबोली मंडलचे रवींद्र मडगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले शासनाने आता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत योजनाही जाहीर केले आहेत तसेच शासकीय वस्तीगृह व ज्ञानज्योत आधार योजना साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा १७ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची ही अंतिम दिवस आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सावंतवाडी तालुक्यातील भटक्या विमुक्त जमाती च्या व्यक्तीने व ओबीसी विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.