मसुरे प्रतिनिधी: शिवसेना जि. प. मसुरे विभागाच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मसुरे बाजारपेठ येथे आमदार चषक खुली भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धा दोन गटात होणार असून खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व द्वितीय पारितोषिक ४ हजार रुपये व प्रत्येकी चषक तर स्थानिक रास स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ठेवण्यात आली असून प्रवेश फी दिल्यानंतरच संघाची नोंद केली जाईल. अधिक माहितीसाठी राजेश गावकर (9309125118), राहुल परब, प्रथमेश पाटकर , सचिन पाटकर, धनंजय परब येथे संपर्क साधावा.