मसुरे प्रतिनिधी: राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव अंतर्गत देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार येथे संपन्न झालेल्या देवगड तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्री भगवती हायस्कूलच्या “जय किसान” या विज्ञान नाट्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
मानव कल्याण साठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषया अंतर्गत स्मार्ट शेती हा उप विषय निवडण्यात आला होता. यामध्ये पारंपरिक शेती, यांत्रिकीकरण, अंधश्रद्धा, शेतकी विज्ञान, A I, आणि तंत्रज्ञान अशा विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला.
एकांकिके तील संवाद, नेपथ्य, अभिनय, सादरीकरण आणि विज्ञानाशी असलेली सुसंगती यामुळे सादरीकरण प्रभावी झाले असे गौरोवोउद्गागार मान्यवरा नी काढले. तळेबाजार हायस्कूल चे मुख्याध्यापक राजेश वाळके, प्रा. नागेश दफ्तरदार, सचिन वळंजू, जिल्हा विज्ञान मंडळाचे सत्यपाल लाडगावकर, देवगड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सतीशकुमार कर्ले आदींच्या हस्ते विध्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
विज्ञान नाट्यामध्ये प्रमुख भूमिका अनन्या गावकर, सोहम हिर्लेकर, श्रावणी माटवकर, ओम मुणगेकर, वेदांत तवटे, आराध्या कदम, जय सावंत, स्मित पाडावे, या विध्यार्थ्यानी साकारल्या. तर नेपथ्य सहाय्य मृगाक्षी हिर्लेकर, लावण्या पटकरे, अथर्व पटवर्धन, अमर घाडी, आयुष सावंत, अनुराधा कदम या विध्यार्थ्यानी केले. एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन संजीव राऊत, गीत लेखन अनुराधा दीक्षित व संजीव राऊत यांनी, संगीत साथ राजन प्रभू व शैलेश सावंत, तेजल बागडे यांनी दिली.
तसेच हरीश महाले, रश्मी कुमठेकर,सुविधा बोरकर, मनोज मुणगेकर, नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर यांचे सहकार्य लाभले. नेपथ्य रंगभूषा व वेशभूषा तसेच संगीत साथ कला शिक्षिका गौरी तवटे यांनी दिली. विशेष सहाय्य विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले. या यशाबद्दल सर्व कलाकार, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







