Home स्टोरी ह. भ. प. सुनिल मयेकर यांना कीर्तन अलंकार पदवी प्रदान.

ह. भ. प. सुनिल मयेकर यांना कीर्तन अलंकार पदवी प्रदान.

101

सावंतवाडी प्रतिनिधी: किर्तनाच्या माध्यमातून धार्मिक विचारांबरोबरच राष्ट्र, धर्म जागृती करण्याची मोठ्ठी संधी मिळाली आहे. त्यामुळे कीर्तनाचा सदुपयोग करून समाजाला जागृत करा असे आवाहन भगवत भक्ती प्रबोधीनी अध्यक्ष ह. भ. प. श्री पुनाळेकर यांनी केले.

गुरुवर्य कीर्तनभूषण श्रीराम झारापकर शिष्य परिवार यांच्यावतीने आकेरी येथील श्री. विनायक विठ्ठल किर्तन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना कृतज्ञता सोहळ्यात ह. भ. प. श्री पुनाळेकर बोलत होते. यावेळी श्री. विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालयाचे अध्यक्ष मिहिर झारापकर, कार्यवाह ह भ प दिनकर प्रभु केळुसकर, ह भ प शेखर पाडगावकर, श्री धामापूरकर, गुरुदास केळुसकर, ह भ प रामचंद्र मेस्त्री, सौ ललिन तेली आदी कीर्तन तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्त सकाळी देवता पूजन व श्री गुरु प्रतिमा पूजन, त्यानंतर विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालयाच्या विद्यार्थ्याने सामुहिक मंगलाचरण सादर केले. यावेळी ह. भ. प. सुनिल मयेकर, ह. भ. प. संदेश गोसावी, ह भ प विक्रम मुणगेकर, सौ पुर्वा गावडे, कु विणा परब, कु दुर्वा सावंत यांनी सुश्राव्‍य किर्तन सादर करता उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कीर्तन अलंकार पदवी प्राप्त ठरलेल्या ह भ प सुनिल मयेकर, ह भ प संदेश गोसावी, ह भ प विक्रम मुणगेकर, सौ पुर्वा गावडे, कु विणा परब, कु दुर्वा सावंत यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पदवी व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.