सावंतवाडी प्रतिनिधी: निरवडे हायस्कूल येथील इंग्रजीचे निवृत्त शिक्षक विश्वकांत गणपत तारी हे तपासणीसाठी सावंतवाडी येथे आले असता बाजारात फिट येऊन पडले त्यावेळी इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स मधील व्यवसायिक विजय वेंगुर्लेकर, सनी पोकळे व नगरपालिका कर्मचारी गणेश खोरागडे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांच्याशी संपर्क साधला असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर व वृद्ध निवृत्त शिक्षकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल.
डॉ. वजराटकर यांनी त्यांच्यावर उपचार केले असता त्यांना अर्धांगीचा झटका आल्याचे सांगितले त्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी लगेचच गोवा बांबूळ येथे न्यावे लागणार असल्याचे डॉ. वजराटकर यांनी सांगितले. परंतु त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही त्यांचे नातेवाईक मुंबई येथे आहे असं समजलं. सामाजिक बांधिलकी कडून नातेवाईकांचा शोध सुरू आहे तरी संबंधिताचे कोणी नातेवाईक असल्यास किंवा त्यांना ओळखत असल्यास त्यांनी हॉस्पिटल किंवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधावा.