Home स्टोरी वाढदिवसाच्या औचित्य साधून न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या...

वाढदिवसाच्या औचित्य साधून न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या लघुग्रथाचे मुलांना वितरण

80

मालवण: तालुक्यातील कट्टा येथील सौ. मिथिला नागवेकर यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यू इग्लिश स्कूल कसाल या शाळेत ४०० रामरक्षा या सनातन संस्थेच्या लघुग्रथाचे वितरण दि.२३ जुलै रोजी केले.

      शालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना रामरक्षा म्हणता यावी याउद्देशाने त्यांनी या ग्रथाचे वितरण शाळेत केले आहे. या शाळेत पाचवी ते बारावी पर्यंत वर्ग असून शाळेतील सर्वच मुलांना 400 ग्रथाचे वितरण केले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. स्नेहा बालम यांनी दर शनिवारी या शाळेत प्रार्थना झाल्यावर रामरक्षा, श्री हनुमान चालिसा व मारूतीस्तोत्र आपण सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेणार आहे. त्यामुळे दर शनिवारी हा ग्रथ शाळेत येताना घेऊन यावा असे सांगितले. तसेच रोज संध्याकाळी घरी गेल्यावर दिवालावणीवेळी रामरक्षा म्हणण्यास सांगितले़ या उपक्रमावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. स्नेहा बालम, सौ. सुमन गवस, श्री. पुडलिक गवस,डॉ संजय जोशी आदी उपस्थित होते. सौ. मिथिला नागवेकर यांना यापुर्वीही अनेकदा सनातनच्या संस्कार वह्या शाळेत वितरण करून मुलांमध्ये या वह्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम तसेच क्रांतिकारकाचा ईतिहास व धार्मिक नितीमुल्ले रूजवण्याचा प्रयत्न केला आहे.