Home स्टोरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा …! भास्कर काजरेकर

आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा …! भास्कर काजरेकर

72

मसुरे प्रतिनिधी: शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास निश्चितच त्यातून चांगले उत्पन्न निर्माण होऊ शकते. यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेणे सुद्धा जरुरीचे असते. प्रशासनाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हा उपक्रम अतिशय सुंदर असून अशा उपक्रमांचा लाभ प्रत्येक गावागावात शेतकऱ्यांना झाला पाहिजे असे मत कृषी विज्ञान केंद्र किर्लोस चे शास्त्रज्ञ श्री भास्कर काजरेकर यांनी राठिवडे येथे बोलताना केले.

 

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राठीवडे येथे नाचणी व वरई पिकावरील आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ श्री भास्कर काजरेकर, राठीवडे सरपंच श्रीम दिव्या धुरी, मंडळ कृषी अधिकारी पोईप श्री दशरथ सावंत, ओवळीये सरपंच श्रीम रंजना पडवळ, उपकृषि अधिकारी पोईप श्री श्रीपाद चव्हाण, राठीवडे उपसरपंच श्री स्वप्निल पुजारे, असगणी उपसरपंच श्री देवेंद्र पुजारे, पं. स.विस्तार अधिकारी श्री रणसिंग, ग्रा. प.सदस्य श्री बाळा धुरी ,श्रीम काजल धुरी, श्री यशवंत राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम अमृता राणे, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम स्नेहल जिकमडे, कृषी सेवक श्री नितेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री विनोद रावले, पोलीस पाटील श्री. संदेश धुरी तसेच वरई व नाचणी पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी व इतर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी नाचणी व वरई लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन आणि कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषि अधिकारी, असगणी श्रीम स्नेहल जिकमडे यांनी केले.