Home क्राईम प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी..! वडिल विलास तावडे यांची मागणी.

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी..! वडिल विलास तावडे यांची मागणी.

79

सावंतवाडी प्रतिनिधी: माझ्या मुलीने कोणताही गुन्हा केला नसताना नाहक तिला त्रास देण्यात आला आणि तिला जीवन संपवण्यापर्यंत ज्यांची मजल गेली. या व्यक्तींना कधी शिक्षा होईल? आम्हाला न्याय मिळेल का? असा सवाल करत ज्यांच्यामुळे एक कुटुंब उध्वस्त झाले अशा व्यक्तींना न्यायदेवतेनेही शिक्षा द्यावी. अशी आमची मागणी आहे. अशी कैफियत प्रिया चव्हाण हिचे वडिल विलास शंकर तावडे व त्यांच्या पत्नीने माजी खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.

मृत प्रिया चव्हाण

जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी ही नातेवाईकांनी काही दिवसापूर्वीच केली आहे. आम्हा कुटुंबीयांना न्याय द्यावा. पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जे दोषी आहेत आणि जे तक्रारीत ज्यांची नावे दिली आहेत. त्यांची पूर्व इतिहास तपासावा अशी मागणी ही करण्यात आली आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता प्रिया चव्हाण हिने गळफास लावून घेऊन पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी तिचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात माझ्या मुलीला जीवन संपण्यापर्यंत त्रास देण्यात आला. त्यांची नावे ही तक्रारीत दिली होती.

याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांनी आज कलमिस्त येथे श्री तावडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व हकीगत जाणून घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, गुणाजी गावडे, पंकज शिरसाठ, सुनील गावडे, उमेश नाईक, अशोक धुरी  माजी पंचायत समिती सदस्य तथा उप तालुका संघटक रमेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री तावडे यांनी आपली मुलगी अत्यंत हुशार होती. ती सासरच्या मंडळींना अत्यंत प्रिय होती. तिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन ती आता स्थिर स्थावर होत होती. असे असताना नाहक तिच्यावर खोटे आरोप करून तिला जीवन संपवण्यापर्यंत देवगड माजी नगराध्यक्ष प्रणाली माने व तिचा मुलगा आर्यमाने यांनी जो त्रास दिला त्यामुळे तिने आत्महत्या केल्याने आपले जीवन संपविले तसेच त्यांचा पती मिलिंद माने हेही त्यात दोषी आहेत. ३ जुलैला जी एकत्रित बैठक झाली त्या बैठकीत जे घडले त्यानंतरच तिने चार जुलैला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ती आत्महत्या करणारी मुलगी नाही. यामागे काहीतरी गौड बंगाल आहे. त्यामुळे याचा सखोल तपास पोलिसांनी करावा. अशी मागणी आमची आहे. आपल्याकडून आम्हाला न्याय मिळेल. अशी आमची अपेक्षा आहे. न्याय देवतेनेही आणि पोलीस यंत्रणेने आमच्या या मागणीकडे गांभीर्याने पाहावे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींना राजकीय हस्तकापायी. दमदाटी करून असे कुटुंब उध्वस्त करण्याची वृत्ती बळावेल. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा. अशी त्यांनी कैफियत मांडली.

यावेळी श्री राऊत यांनी निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. राजकीय बलाढ्य वापरून जर कोणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दमदाटी करत असेल तर अशी प्रवृत्ती निश्चितपणे घालवायला हवी. यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे स्पष्ट केले. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे ही या प्रकरणात तक्रारीत ज्यांची नावे आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही नातेवाईकांनी केली आहे.