Home शिक्षण सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

71

सावंतवाडी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , सावंतवाडी शाखेच्या वतीने काल ११ जुलै रोजी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दोडामार्ग मधील आ.दीपकभाई केसरकर महाविद्यालयाचे प्रा. सुदीप नाईक सर उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी विभागाचे संगठन मंत्री ओजस जयवंत, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ठाकूर सर होते. सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विनीजी परब, JIGNASA कोंकण प्रांत संयोजक स्नेहा धोते तसेच सावंतवाडी शहर प्रमुख ज्ञानेश्वर गवळी, हे मंचावर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला एकूण १४० विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासोबतच, त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणारे विचार मांडण्यात आले.ABVP नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून, अशा उपक्रमांद्वारे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करत आहे, असे प्रतिपादन आयोजकांनी यावेळी केले.