Home शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर २ चे दोन विद्यार्थी...

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर २ चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

57

सावंतवाडी प्रतिनिधी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२५ मध्ये कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा विद्यार्थी शंकर विजय परब याने ३०० पैकी २४२ गुण प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत २१ वा येण्याचा मान पटकावला. तसेच वैभव प्रवीण हनपाडे या विद्यार्थ्याने २२८ गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीत ३५ वा क्रमांक प्राप्त केला. . शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच जिद्द,चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर या विद्यार्थ्यांनी हे सुयश मिळवले आहे.दोन्ही विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीम. सीमा पंडित, शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या पोकळे तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येण्याबरोबर कु. वैभव हनपाडे याची नवोदय विद्यालयासाठी देखील निवड झाली आहे.दरवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखत या दोन्ही विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद,पालक तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.