Home स्टोरी मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या सहभागातून १०१ वृक्षांची लागवड..!

मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या सहभागातून १०१ वृक्षांची लागवड..!

107

मसुरे प्रतिनिधी: निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्त श्री आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे पूल नजीकच्या रस्त्याला लागूनच वनौषधी, फुलझाडे अशा विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली. त्यावेळी बांदिवडे गावचे सरपंच आशु मयेकर, ग्रामसेवक सौ रावले मॅडम, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, नारायण परब, सौ.अंजली घाडी,विश्वनाथ परब, लीलाधर मुणगेकर, अशोक चेंदवणकर, किरण सावंत, महेश हिरलेकर, रंजन प्रभू, शामसुंदर प्रभू, सुभाष मुणगेकर, सदानंद पोयरेकर, सूर्यकांत पवार, विजय आरेकर, शशी आरेकर आणि बांदिवडे ग्रामस्थ उपस्थित होते.. यावेळी बोलताना सरपंच आशू मयेकर म्हणालेत आप्पा परब यांचा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून गावाच्या हिताचा असा आहे. त्यांच्या या उपक्रमातून त्यांचे सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे. त्यांचा आदर्श आज सर्वांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.