Home स्टोरी साटेली भेडशी येथील तलवार प्रकरणाची योग्य ती चौकशी करा..! पिडीत मुस्लिम कुटुंबाचे...

साटेली भेडशी येथील तलवार प्रकरणाची योग्य ती चौकशी करा..! पिडीत मुस्लिम कुटुंबाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

1096

सिंधुदुर्ग( दोडामार्ग): गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ मुस्लिम नदाफ कुटुंब दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे वास्तव्यास आहे. या कुटुंबातील अश्फाक नदाफ उदरनिर्वासाठी टायर पंचर दुकान आणि JCB चा व्यवसाय करत आहे. त्याचा दुसरा भाऊ यासिन नदाफ पोल्ट्री व्यवासाय आणि मालवाहतूक गाडीचा व्यवसाय आहे. तसेच गावात तीस वर्षापासून चिकन सेंटर आहे. याच व्यवसायातून या मुस्लिम कुटुंबीयांनी गावात चांगली प्रगती केली. सर्व काही सुरळीत सुरु असतांना धर्माच्या नावाखाली पैसे कमवणाऱ्या आणि जमिनी वसुली करणाऱ्यां काही  विकृत बुद्धीच्या व्यक्तींची नजर या कुटूंबावर पडली. वेगवेगळ्या मार्गाने देणगी स्वरूपात पैसे घेऊन हि या विकृत व्यक्तींची मनशांती न झाल्याने आता नदाफ कुटुंबाने स्वकष्टाने जमा केलेली मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन नदाफ कुटुंबाला गावातून हाकलवून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न काही विकृती बुद्धीचे खंडणीखोर करत आहेत. दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील अश्फाक नदाफ याने आपल्याच घराच्या बाजूला मित्रपरिवाराकडे मालकी हक्काची ७४ गुंठे असलेल्या एका सामायिक जमिनीतील १५ गुंठे जमीन विकत घेतली. हीच जमीन स्वतःला मिळण्यासाठी काही विकृत बुद्धीच्या व्यक्तींनी वारंवार प्रयत्न केले. पण ते प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळेच नदाफ कुटुंबीयांच्या विरोधकांनी २७ एप्रिल २०२५ रोजी एका घरात साध्या भाजी कापायच्या सुऱ्या ठेवून खूप मोठी घातक हत्यारे सापडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करून या नदाफ कुटुंबाला उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. घरात सापडलेली हत्यारे हि नदाफ कुटुंबातील व्यक्तींनीच ठेवली आहेत. असं सांगून त्या नदाफ कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या विरोधकांनी आतंकवादी असल्याचेच घोषित केले. नदाफ कुटुंबातील व्यक्तींपासून गावातील लोकांना धोका आहे. तसेच हिंदू मुस्लिम दंगे होऊ शकतात असं सांगून जवळपासच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यानंतर कोणत्याही कायद्याचा विचार न करता सटेली भेडशी ग्रामपंचायत मध्ये सभा घेऊन या मुस्लिम नदाफ कुटुंबियांचे व्यवसाय धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम नदाफ कुटुंबियांचे विरोधक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नदाफ कुटुंबियातील अश्फाक नदाफ याला दमदाटी करून,  अश्फाक नदाफ आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या राहत्या घरात अशीच हत्यारे ठेवून वेगवेगळ्या केसेस मध्ये फसवणार अशी धमकी देऊन त्याची मालकी हक्काची जमीन ३० एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायत साटेली भेडशीच्या नावे करून घेण्यात आली.

या सर्व प्रकरणात नदाफ कुटुंबीयांना कोणीही योग्य प्रकारे साथ दिली नाही. त्यामुळे साहजिकच नदा कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे. काही दिवसांनी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन नदाफ कुटुंबियांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु काही टवाळखोर व्यक्ती नदाफ कुटुंबाच्या दुकानासमोर तसेच घराच्या आजूबाजूला फिरत राहून नदाफ कुटुंबियांना वेगवेगळ्या प्रकारे धमकी देऊन धंदा बंद करण्यास सांगत असल्याने नदाफ कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच काही व्यक्ती नदाफ कुटुंबातील महिलांनाही दमदाटी करत आहेत. तसेच नदाफ कुटुंबियातील यासीन नदाफ याची मालवाहतूकिची गाडी रस्त्यात अडवून त्या गाडीत काय आहे? असे प्रश्न विचारून हाणामाऱ्या करण्याचे प्रयत्नही काही व्यक्ती करत आहेत. या सर्व प्रकारामुळे नदाफ कुटुंबीयांचं सटेली भेडशी गावात जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे आज नदाफ कुटुंबातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकरी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून, २७ एप्रिल २०२५ रोजी जे काही घडलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्हाला लाजस्पद जीवन जगावं लागत आहे. तसेच आम्हाला गावातून हाकलून देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे २७ एप्रिल २०२५ रोजी तलवारी कोणी ठेवल्या? त्या खरंच धारदार तलवारी होत्या काय? तलवारी ठेवून हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला? याबाबत लवकरात लवकर योग्य ते तपास व्हावा आणि मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे आणि योग्य सजा द्यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा योग्य तो तपास लवकरात लवकर करण्यात येईल असं सांगितलं. आता अधिकारी २७ एप्रिल २०२५ रोजी चे तलवार प्रकारण आणि त्यानंतर लगेच ३० एप्रिल २०२५ रोजी नदाफ या प्रकरणाचा योग्य तपास करून अश्फाक नदाफ याला दमदाटी करून त्याची तीन गुंठे जमीन ग्रामपंचायतीला देण्यात आलेली आहे. याचा तपास लवकरात लवकर होईल या आशेवर नदाफ कुटुंब आहे. आज साटेली भेडशी येथील गेले ५० वर्षाहून अधिक काळ रहिवासी असलेल्या मुस्लिम नदाफ कुटुंबियांवर जे घाणेरड्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या आरोपातून नदाफ कुटुंब मुक्त होऊन नदाफ कुटुंब मान सन्मानाने जीवन जगेल अशी आशा आहे. तसेच २७ एप्रिल २०२५ रोजी तलवारी ठेऊन साटेली भेडशी येते हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून हिंदू मुस्लिमयांच्या दंगली करण्याचा प्रयत्न करणारे आरोपी गजाआड जातील का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत हिंदू मुस्लिम दंगे कधी झाले नाही आणि ते दंगे होऊ नयेत, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका यावेळी घेणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा प्रशासकीय अधिकारी योग्य ती भूमिका घेतील यात काही शंका नाही. जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबतच गावातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील सुशिक्षित तरुणांनी आणि सर्व समंजस नागरिकांनी गावात कोणत्याही प्रकारचे दंगे होणार नाहीत किंवा गावात हिंदू मुस्लिम असं नको ते घाणेरडे राजकारण होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच २७ एप्रिल २०२५ रोजी त्या घरात ज्या व्यक्तींनी तलवारी ठेवल्या त्या प्रमुख आरोपींना पकडण्यासाठी सटेली भेडशी गावातील व्यक्तींनी पोलिसांना तपास कामात सहकार्य करून प्रमुख आरोपीना पकडून देण्यासाठी योग्य भूमिका बजावणे गरजेचे आणि महत्वाचे आहे.