Home राजकारण भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांना चौकूळ गावातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत...

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांना चौकूळ गावातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दिल्या शुभेच्छा.

89

सावंतवाडी प्रतिनिधी:  मंगळवार १ जुलै रोजी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय नेते आहेत. सर्वप्रथम २००७ साली रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. नंतर २०९९ साली विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर,ठाणे,पनवेल महापालिकेत भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळाले.

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वत्र बॅनर लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. चौकूळ गावातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, गुलाल उधळत आणि जोरदार जल्लोष करत रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चौकूळ गावचे सरपंच गुलाबराव गावडे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद आप्पा गावडे, माजी सरपंच सुरेश शेटवे, सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे आणि तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.