Home स्टोरी मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा…!

मसुरे येथे ३० रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा…!

36

मसुरे प्रतिनिधी: मसुरा एज्युकेशन सोसायटी मुंबई, लोकल कमिटी मसुरे आयोजित कै. मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ जिल्हास्तरीय वार्षिक पारितोषिके प्रदान करण्याचा सोहळा तसेच श्री. नामदेव शांताराम जाधव, पूर्णवेळ शिक्षक, (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी एम.जी. बागवे (भरतंगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे) यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ सोमवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या वेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्री. श्रीकृष्ण द. मुळीक परब, यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक दत्ता सामंत, मुंबई कार्यकारिणी उपाध्यक्ष उत्तम राणे, चिटणीस प्रसाद बागवे, सौ सरोज परब, महेश बागवे, सोनोपंत बागवे आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष गुणवंतांचाही गौरव संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे आणि भरतगड हायस्कूल देऊळवाडा मुख्याध्यापक श्री. एस आर कांबळे यांनी केले आहे.