मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढा वाडी येथील प्रसिद्ध गवंडी कारागीर, पखवाज वादक, युवा शेतकरी मंगेश शरद बागवे वय 35 वर्ष याचे नुकतेच त्याच्या राहत्या घरी निधन झाले. मंगेश बागवे याला भजन क्षेत्राची मोठी आवड होती स्थानिक भजनांमध्ये तो पखवाज वादन करायचा तसेच परिसरामध्ये एक कुशल गवंडी कारागीर म्हणून प्रसिद्ध होता. धार्मिक,सामाजिक कार्यातही तो नेहमी पुढे असायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. मसुरे येथील प्रसिद्ध डबलबारी युवा भजनी बुवा मनीष बागवे यांचा तो भाऊ होत.







