वेंगुर्ला: सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्लाच्या वतीने दिनांक २२ जून २०२५ रोजी महा रक्तदान शिबीराचे आयोजन कारण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२:३० या वेळेत साई मंगल कार्यालय, एस. टी स्टॅंड जवळ, सुंदर भाटले वेंगुर्ले या ठिकाणी हे महा रक्तदान शिबीर होणार आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी 9420258640 आणि 9823109475 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा. जास्तच जास्त व्यक्तींनी तसेच जीवनविद्या मिशन च्या सभासदांनी या महा रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करावे. असेल आवाहन जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात आले आहे.