Home स्टोरी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

61

सिंधुदुर्ग: – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर राज्य पुरातत्व विभागाने वज्रलेप केला असून मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि तोंडावळा या ठिकाणी पालट झाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ऑगस्ट-सप्टेंबर मासाच्या कालावधीत करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळे देवीच्या तोंडावळ्यावरील पूर्ण भाव पालटले आहेत, अशी वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे मूर्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी १४ मार्चला सकाळी मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. श्री महालक्ष्मी मूर्ती संवर्धनाविषयी १५ मार्चला सुनावणी ! श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी श्री महालक्ष्मी मूर्ती संवर्धनाविषयी ८ सप्टेंबर २०२२ या दिवशी सहदिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. यात त्यांनी ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात जे मूर्ती संवर्धनाचे काम घाईगडबडीने करण्यात आल्यामुळे मूर्तीची हानी झाली आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडे सध्या कुणी सक्षम आणि प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. ज्या लोकांनी हे संवर्धनाचे काम केले ते पात्र नाहीत. त्यामुळे या प्रकरणी करण्यात आलेल्या संवर्धनाविषयी अहवाल सादर करावा’, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज १५ मार्चला होणार आहे.