Home शिक्षण ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा जयवंत परब यांचा वारसा...

ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा जयवंत परब यांचा वारसा या पुढे नेणार..! कामगार नेते प्रकाश परब.

244

मसुरे प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी तन मन धन अर्पण करून शिक्षण घेतल्यास यश निश्चितच मिळते. झुंजार कामगार नेते जयवंत परब यांनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे रोपटे लावून आपल्या ग्रामीण भागातील मुले भविष्यात इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत या त्यांच्या विचारांना यापुढे सुद्धा मी पुढे नेणार आहे. जयवंत परब म्हणजे महाराष्ट्राची शान होती. भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेचा शैक्षणिक आलेख नियमित उंचावलेला असून यापुढे सुद्धा मी सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत कामगार नेते आणि माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी मसुरे येथे बोलताना केले..

माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आणि भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे केंद्र बल गटातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम ज्येष्ठ कामगार नेते कै. जयवंत परब यांच्या जयंतीचे अवचित्य साधून

भरतगड इंग्लिश मीडियम सभागृहामध्ये कामगार नेते प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मसुरे केंद्रामधील आणि भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या प्रशालेतील गुणवंत शिक्षकांचाही गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात जयवंत परब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, आर पी बागवे हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष राजन परब, माजी सरपंच संदीप हडकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विना मेहंदळे मॅडम, माजी मुख्याध्यापक किशोर देवूलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, बापू मसुरेकर, संतोष सावंत, केशव भोगले, ठाकूर मॅडम, सायली म्हाडगुत, सिद्धी मेस्त्री,वसंत प्रभूगावकर, स्वरा चव्हाण, सौ रेशमा बोरकर पेडणेकर, सौ पार्वती कोदे, सौ गौतमी प्रभू गावकर, सौ सविता मेस्त्री, सौ स्टेला लोगो, स्वरांजली ठाकूर, समीर गोसावी, तनुश्री नाबर, रसिका मेस्त्री, श्रुतिका लाड, विभावरी पराडकर, समीर सावंत, बबन धारगळकर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, संस्था सभासद, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी इंग्लिश मीडियम च्या जडणघडणीबाबत आणि कामगार नेते जयवंत परब यांच्या कार्याविषयी सभागृहाला माहिती दिली. प्रकाश परब यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ही संस्था शैक्षणिक योगदानाचे कार्य करत असून यासाठी यापुढे सर्वांनी एक दिलाने सहकार्य करण्याचे आवाहनही केले. यावेळी संस्कृती मसुरेकर, मानस धरगळकर, श्रावणी पालव, धृती भोगले, श्रीया परब यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित पालक वर्गातून महेश मुळीक यांनी वैयक्तिक गणित व विज्ञान विषयात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली म्हाडगुत व सिद्धी मेस्त्री यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

 

फोटो..

मसुरे भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कामगार नेते प्रकाश परब, सोबत मामा भोगले संदीप हडकर राजन परब आणि मान्यवर.