Home शिक्षण विद्याअविष्कार आणि महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या संयुक्त विद्यमानाने ” सक्षम विद्यार्थी आधार ”...

विद्याअविष्कार आणि महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या संयुक्त विद्यमानाने ” सक्षम विद्यार्थी आधार ” शिबिराचे आयोजन.

58

सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषेत शब्दांचे लेखन करताना शुद्धता आणि व्याकरणिक नियमांचे पालन करणे. यात मुख्यत्वे ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी, उकार, अनुस्वार, विरामचिन्हे, जोडाक्षरे, आणि इतर व्याकरणिक नियम यांचा समावेश होणे म्हणजेच मराठी शुद्धलेखन होय. वाढत्या इंग्रजी माध्यम च्या शाळा आणि त्या शाळांकडे पालकांची वाढत चालली ओढ पाहता भविष्यात मराठी अभ्यासक असलेल्या विध्यार्थ्यांना पुढे चांगले भविष्य तसेच चांगल्या करिअर करिअर संधी उपलब्ध होणार आहेत. यात काही शंका नाही.

याचाच योग्य विचार करून तसेच मराठी भाषा ही कायमस्वरूपी टीकावी व त्याचे महत्त्व वाढावं आणि मराठी भाषा मुलांना योग्य पद्धतीने यावी व  मुलांचे भविष्य उज्वल व्हावं यासाठीच विद्या आविष्कार व महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या संयुक्त विद्यमानाने  या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपली मुलं भविष्यात योग्य प्रवक्ते बनावेत. मराठी भाषेचे प्राध्यापक बनावेत. योग्य मराठी भाषा चे अभ्यासक बनावेत. यासाठी आपण या शिबिराचा नक्की लाभ घ्यावा.