Home स्टोरी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने १४ मार्च रोजी कुडाळ येथे खोट्या...

मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने १४ मार्च रोजी कुडाळ येथे खोट्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणाबाबत विशेष बैठकीचे आयोजन.

91

कुडाळ प्रतिनिधी: जिल्ह्यात खोट्या अॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढत आहेत. असाच प्रकार सामाजिक कार्यकर्ते आना भोगले यांच्यावरील केसमध्ये पाहायला मिळत आहे, असा आरोप करून भोगलेंविरुद्ध एका शासकीय अधिकाऱ्याने अॅट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींविरुद्ध लढा देऊन भोगले यांना न्याय देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गची बैठक १४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयोजित केली आहे. बैठकीला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केले आहे. याबाबत अॅड. सावंत यांनी म्हटले आहे, आपल्या जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांना मान दिला जातो. सिंधुदुर्गची जनता कधीही अधिकारी वर्गाची जात पाहत नाही व सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमी सहकार्याची भूमिका घेते. जिल्ह्यातील ही पहिली केस आहे, जी शासकीय अधिकाऱ्याने दाखल केली आहे. अशाच खोट्या केसीस दाखल झाल्यास सवर्ण व ओबीसी वर्गातील जनतेला कोणत्याही सरकारी कार्यालयात निर्भयपणे जाता येणार नाही. त्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.