मसुरे प्रतिनिधी: बडनगर, उज्जैन, मध्यप्रदेश येथे २२-२३ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या हौशी ड्रॉपबॉल (व्हॉलिबॉल) फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय ड्रॉपबॉल (पुरुष/महिला) स्पर्धेसाठी वेंगुर्ला सिंधुदुर्गचे सुपुत्र अशोक दाभोलकर -मेस्त्री यांची स्पर्धा निरिक्षक तर शशिकांत गवंडे यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. मध्य प्रदेशचे विक्रमादित्य अवार्ड विजेते माजी भारतीय शूटिंगबॉल कर्णधार व ड्रॉपबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष श्री. भास्करराव भागवत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सदत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या स्पर्धेसाठी भारतातील पुरुष व महिला गटात एकूण २० राज्य सहभागी होत असून दोन्ही गटाला सारखीच म्हणजे अनुक्रमे ५१००००, ३१००००, २१००००, ११०००० व उत्तेजनार्थ १०००, १०००, १०००, १००० अशी चार बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच दिनांक २१ मार्च २०२५ रोजी बडनगर, उज्जैन येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पंचशिबिराला अशोक दाभोलकर मार्गदर्शन करतील. सदर माहिती हौशी ड्रॉपबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव महादेव माने (पुणे, महाराष्ट्र) ह्यानी दिली आहे.