Home शिक्षण अहो आश्चर्य…! आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती...

अहो आश्चर्य…! आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती तर एकाची बदली.

96

मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ………….त्रिव्र आंदोलन छेडण्याचा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा..

 

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाने सावळा गोंधळ घातला असून एक ते आठ वर्ग असलेल्या प्रशालेमध्ये आदल्या दिवशी या प्रशालेत कायम असलेले दोन शिक्षक त्याच प्रशालेत कामगिरी वरती म्हणून त्यांची नियुक्ती केली असून एका शिक्षकाची चक्क बदली करून त्यांना येथून स्थानिक समिती ग्रामस्थ यांना अंधारात ठेवून कार्यमुक्त केलेले आहे. आता या क्षणी या प्रशालेत एक शिक्षक फक्त कायमस्वरूपी असून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला असून याबाबत आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश राणे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सांगून आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

मसुरे केंद्र शाळेमध्ये सेमी इंग्रजी असून या ठिकाणी एक ते आठ वर्ग आहेत. सुमारे ८० ते ९० विद्यार्थी या प्रशालेमध्ये शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी केडर प्रमाणे चार शिक्षक मंजूर होते. या ठिकाणी चार शिक्षक कार्यरत पण होते. परंतु दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याच्या आदेशावरून मालवण तालुक्यातील एका शिक्षण अधिकाऱ्याने लगेच फतवाकडून येथील एका शिक्षकाला कार्यमुक्त केले आणि उर्वरित दोन शिक्षकांना त्यांच्या दुसऱ्या शाळेवरती दाखवून पुन्हा याच शाळेमध्ये कामगिरी वरती आणण्याचा अजब असा सावळा गोंधळ केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी मालवण येथील शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून संपर्क केला असता सदर अधिकारी संपूर्ण दिवसभर दूरध्वनी वरती उपलब्ध झाला नाही. एकदा सदर अधिकारी उपलब्ध झाल्यावरती लगेचच त्याने थोड्या वेळाने पुन्हा कॉल करतो असे सांगून फोन ठेवून दिला तो अद्याप पर्यंत ग्रामस्थांना कोणताही संपर्क साधलेला नाही. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा आक्रमक झाली असून याप्रशालेत कायमस्वरूपी शिक्षक मिळाले नाही तर शाळा बंद आंदोलन करून सर्व मुले मालवण येथील त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या दालना बाहर शाळा भरविणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे आणि मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी इशारा दिला आहे..

येथील ग्रामस्थांना तसेच शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाने येथील शिक्षकांना कार्यमुक्त केले. याबाबत शिक्षण विभागाला येथील प्रशाले वरती मनमानी करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. १५० वर्षाची परंपरा असलेल्या या प्रशालेमध्ये आणि येथील ग्रामस्थांचे या प्रशालेच्या माध्यमातून शिक्षण विभागाला नेहमीच सहकार्य असताना मसुरे केंद्र शाळेवरती एक प्रकारे अन्याय करून येथील सुमारे ८० ते ९० विद्यार्थ्यांचे नुकसान सदरच्या दोन आणि या प्रक्रियेमधील लहान थोर सर्व अधिकाऱ्यांमुळे होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत मालवणीच्या एका बड्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला वारंवार दूरध्वनी करून सुद्धा दूरध्वनी उचलून ग्रामस्थांची समस्या काय आहे याची दखल घेतली गेली नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्या विरोधात नाराजी पसरली असून लवकरच याबाबत पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. याबाबत या प्रशालेतील एक शिक्षक गेल्यावर्षी आंतरजिल्हा बदली होऊ नये त्या शिक्षकाचे काहीतरी देयक बाकी असल्यामुळे एक वर्ष शिक्षण विभागाने त्याला थांबवून धरले होते आणि आता असा अचानक कोणता चमत्कार घडला म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्याने त्याला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. याबाबतही सखोल चौकशी होणे जरुरीचे असून संबंधित विभागातील मालवण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील दोन्ही अधिकाऱ्यांची तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे आदेश फॉलो करणाऱ्या सर्वांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी लक्ष्मी पेडणेकर यांनी केली आहे..