सावंतवाडी प्रतिनिधी: ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ व महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने, महासंघाच्या महिलांसाठी एक वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या भारत देशाचा पुरुष व महिला क्रिकेट संघ जागतिक पातळीवर नंबर एक ची कामगिरी करत आहे. तसेच गल्लोगल्ली प्रिमीयर लीग खेळले जात असताना, माहासंघाच्या महिला सदस्या मागे का राहावे ? म्हणून महासंघाच्या महिलांनी ८ मार्च रोजी अंडर आर्म क्रिकेट लीग NSPL २०२५ स्पर्धेचे आयोजन केले आहे (नारीशक्ती प्रीमियर लीग २०२५ ) या स्पर्धेमध्ये एकूण चार संघ ऑक्शन द्वारे निवडले गेले आहेत, ते
१) राजमाता रॉयल्स = संघाचे संघमालक सुभेदार मेजर उमेश वेंगुर्लेकर ( निवृत्त) व संघाचे कॅप्टन सौ अमृता वेंगुर्लेकर
२) राणी लक्ष्मीबाई वॉरियर संघमालक सुभेदार मेजर मनोज प्रकाश सावंत, टीम कॅप्टन सौ मानसी मनोज सावंत
३)सावित्रीबाई स्ट्रायकर्स संघमालक कॅप्टन धोंडीराम पाटील ( सेवानिवृत्त) कोल्हापूर व कॅप्टन सौ रोशनी गावडे
४) महाराणी सुपर क्वीन संघमालक श्री हेमंत उत्तम कदम कॅप्टन सौ मिलन सावंत
हे संघ आपापसात चार चार ओव्हरचे सामने खेळतील व पॉईंटच्या आधारे पहिले दोन संघ अंतिम सामना खेळतील सदर सामने ८ मार्च रोजी ठीक २:३० वाजल्यापासून सावंतवाडी नरेंद्र डोंगर च्या पायथ्याशी होळीचा खुंट येथील खेळपट्टीवर खेळले जातील. तरी या सामन्यांचे खेळ प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून सावंतवाडीत पहील्यादाच होत असलेल्या अंडर आर्म क्रिकेटपटू महिलांना शुभेच्छां व प्रोत्साहन प्रदान करू.