सावंतवाडी प्रतिनिधी: इन्सुली संत सोहिरोबानाथ सेवा समिती इन्सुलीआणि उत्कर्ष युवक कला क्रिडा व्यायाम मंडळ इन्सुलिडोबाची शेळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत सोयरोबनात मंदिरामध्ये आगळावेगळा पद्धतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिलांना मार्गदर्शन करताना कुडाळ येथील उद्योजिका सौ निलांबरी पालव म्हणाल्या महिला आणि स्वतःच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. छोटे घरगुती व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहून आपले कुटुंब आर्थिक सक्षम बनवणे आज काळाची गरज आहेयासाठी योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गक्रमण होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्सुलि येथील पालवडा हॉटेलच्या संचालिका अनिता अरुण पालन यांनी महिला दिनाच्या औचित्य साधून संत सोहिरोबांना थ सेवा समितीआणि उत्कर्ष युवक मंडळाचा आजचा हा वैशिष्ट्यपूर्ण महिलांसाठी सन्मानित करण्याचा सोहळा खूपच स्तुत्य वाटला. मंडळाचे कार्य सतत उत्कर्षा प्रत जाण्यासाठी महिलांकडून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर निवृत्त अभियंता तसेच सद्गुरु वामनराव पै यांचे पट्ट शिष्य शिवाजीराव पालव, माजी शिक्षण आरोग्य सभापती सेवा समिती अध्यक्ष विश्राम पालव, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नितीन राहुल, माजी सरपंच विठ्ठल पालव, उमेश पेडणेकर, स्वागत नाटेकर, संजय तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील सहाआशाताई, इन्सुली पोलीस पाटील सौ. जागृती गावडे, क्षेत्रफळ पोलीस पाटील सौ. प्रियांका कोठावळे, महिला इंजिनियर सौ. मानसी दूरी, गावातील उच्चशिक्षित महिला निवडे, गावच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गौरवी पेडणेकर, विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सौ. विद्या पालव तसेच डोबाची से वाढीतील आपल्या पतीचे ऐन तारुण्यांमध्ये निधन झाल्यावर कुटुंबाचा योग्य सांभाळ करून मुलांना योग्य दिशा देऊन कुटुंबाचा सांभाळ केला. अशा दहा महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट भात शेती करणाऱ्या महिला सौ सुनीता सूर्यकांत सावंत आणि सौ प्रिया स्वागत नाटेकर यांचा विशेष सन्मान उद्योजक संजय तावडे यांनी सन्मान केला.
तसेच इन्सुलिटोबाची शेर वाढीतील सर्व १९७ महिलांना पुरुष वर्गाकडून साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कावेरी सावंत, मानसी धुरी, शिवाजी पालव, गौरव पेडणेकर, उमेश पेडणेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हेतू गुरुनाथ पेडणेकर यांनी मांडला तर सूत्रसंचालन सौ विद्या पालव, आभार स्वागत नाटेकर यांनी मानले. यावेळी महेंद्र पालव, औदुंबर पालव, सुभाष तावडे, शैलेश पालव, महेंद्र सावंत, स्वरूप नाटेकर, रामचंद्र नाईक, अरुण पालव, शुभांगी मुळीक, तीलोत्तमा परब, सुर्वणा तावडे, प्रिया नाटेकर, सुषमा पालव, नेहा तावडे सारिका पेडणेकर, स्वाती नाटेकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.